सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या 81 व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…  ‘हिंदू एकता दिंडी’द्वारे हिंदुत्वाचा गजर !

33

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अखंडपणे कार्यरत असलेले सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या 81 व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरातून दिनांक 27 मे ला सायकली 5 वाजता ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली. या दिंडीच्या माध्यमातून समस्त हिंदूंना देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी पद, पक्ष, संघटना विसरून एक हिंदु म्हणून संघटित होण्याची हाक देण्यात आली. पारंपरिक वेशात हातात भगवे झेंडे घेतलेले आणि भगवे फेटे परिधान केलेले हिंदुत्वनिष्ठ, तसेच वारकरी पथक, लहान मुलांच्या ऐतिहासिक व्यक्तीरेखा यांमुळे छत्रपती संभाजीनगरातील वातावरण भारावून गेले होते.

दिंडीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची प्रतिमा असलेली पालखी ठेवण्यात आली होती !

650 हून अधिक राष्ट्र आणि धर्म प्रेमींनी या हिंदू एकता दिंडीत सहभाग नोंदवला. फेरीचा प्रारंभ स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, समर्थनगर येथून झाला. तत्पूर्वी श्री शरद पाटील यांनी शंखनाद केला. त्यानंतर हिंदू विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य पू. अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन आणि धर्मध्वजाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी श्री. विश्वास नागापूरकर यांनी पौरोहित्य केले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या पालखीचे पूजन वडोद येथील नाथ संप्रदायाचे पूजनीय यशवंत शिवणगिरीकर महाराज यांनी सपत्नीक पूजन केले. छत्रपती संभाजीनगर येथील ग्रामदैवत श्री संस्थान गणपती पालखीचे पूजन प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्री भावेश सराफ यांनी सपत्नीक केले अन् नारळ वाढवले. पुढे निराला बाजार, पैठण गेट, गुलमंडी, औरंगपुरा मार्गे खडकेश्वर, नारळीबाग येथे पावन गणपती मंदिर येथे दिंडीची सांगता झाली. सांगतेच्या वेळी धर्मयोद्धा संघटनेचे अध्यक्ष नागेश्वरानंद महाराज तसेच सनातन संस्थेच्या सौ. छाया देशपांडे यांनी उपस्थितांना संबोधित केले.

 दिंडीत सहभागी विविध पथके !

रणरागिणी पथक, तुळसी वृदावन पथक, कळस पथक, ध्वज पथक, ग्रंथ दिंडी, कराटे प्रात्यक्षिक पथक, प्रथमोपचार पथक, अधिवक्ता पथक, महिला पथक, वारकरी पथक, टाळ पथक, बाल पथक अशी विविध पथके आणि प्रात्यक्षिके दिंडीच्या मार्गात सदर करण्यात आले.