जय अहिल्या नाईट टीपीएल क्रिकेट स्पर्धेत शाश्वत संघ अजिंक्य

42
टेंभुर्णी –येथील अहिल्यादेवी क्रिकेट मंडळातर्फे घेण्यात आलेल्या जय अहिल्या नाईट टीपीएल अर्थात टेंभुर्णी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत शाश्वत हॉस्पिटल या संघाने अजिंक्यपद पटकाविले आहे तर एसपी द गेम चेंजर या संघाने उपविजेतेपद जिंकले आहे. तर तृतीय क्रमांक बादल या संघाने पटकाविले. रात्रीच्या वेळी फोकस च्या उजेडात खेळल्या गेलेल्या या क्रिकेट स्पर्धेत १२ संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेसाठी पहिले बक्षीस रुपये ५१ हजार ( अहिल्यादेवी क्रिकेट मंडळातर्फे), द्वितीय बक्षिस ३१ हजार रुपये(संजय जैस्वाल यांच्यातर्फे), तृतीय बक्षीस २१ हजार रुपये (सरपंच सुमन म्हस्के, उपसरपंच मनीषा पाचे, भातोडीचे माजी सरपंच अंकुश उगले यांच्या संयुक्त विद्यमाने) ठेवण्यात आले होते. स्पर्धेत पंच म्हणून धनराज देशमुख व अर्जून देशमुख यांनी काम पाहिले.
    या स्पर्धेचे बक्षीस वितरण बुधवारी सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई शालिकराम म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाश्वत संघाचा कर्णधार प्रवीण देशमुख याने टीपीएल चषक व बक्षिसाचा स्विकार करताच संघातील खेळाडूंनी एकच जल्लोष केला. यावेळी गौतम म्हस्के, संतोष पाचे, संजय जैस्वाल, डॉ.मयूर लहाने, अंकुश उगले, कविता खोत, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
   स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अहिल्यादेवी क्रिकेट मंडळाचे धनराज देशमुख, गणेश देशमुख, राहुल देशमुख, योगेश पेटूळे, कृष्णा जाधव, दीपक देशमुख, अनिल भोरे, सचिन मुकुटराव, राज देशमुख, सुमित देशमुख, यश जाधव, अमोल देशमुख, सचिन डोमाळे, मनोज देशमुख, अमोल मैंद, अर्जुन देशमुख, सचिन देशमुख, केतन खंडेकर, सागर इंगळे, अक्षय डोमळे, आकाश चंदनशिवे,अजिंक्य शिल्लारकर, करण दांडगे, अजय देशमुख, सचिन भिसे, शुभम भिसे, सचिन सपकाळ आदिंनी पुढाकार घेतला.