टेंभुर्णी | जाफराबाद | प्रतिनिधी – येथील सिद्धार्थ कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात घेण्यात आलेल्या उच्चा माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा-२०२३ च्या परीक्षेच्या निकालात महाविद्यालयाने सर्वोत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत महाविद्यालयाचा एकूण निकाल ९२.५३% लागला असून शाखानिहाय निकाल कला -८९.१७%, वाणिज्य
-८०.३३%, विज्ञान-९४.११% लागला आहे. यावर्षीच्या निकालात महाविद्यालयातून तिन्ही शाखेत सर्वप्रथम येण्याचा मान मुलींनी पटकावला असून कला शाखेतून प्रथम क्रमांकाने कु. मगर शीतल ज्ञानेश्वर -८८.१७% ,द्वितीय कु. राऊत प्रियंका संजय-८५.५०%, तृतीय कु. चांदा अश्विनी रतनसिंग -८३%, वाणिज्य शाखेतून प्रथम कु.दळवी ऋतिक प्रकाश -८०.३३%, द्वितीय कु. लोखंडे अनिता अर्जुन-७९.८६.%, तृतीय कु. दळवी शितल राजु-७९.३३% आणि विज्ञान शाखेतून प्रथम कु. महाजन कल्याणी सीताराम -८०.५०%, द्वितीय कु. काकडे दीप्ती केशव-७८.५०% तृतीय जंजाळ अजय जनार्धन -७८.३३% गुण संपादन करून गुणानुक्रमाणे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल सिल्लोड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. दादासाहेब म्हस्के,सचिव प्रा. राहुलभाऊ म्हस्के, महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. श्याम सर्जे, उपप्राचार्य, डॉ. सुनील मेढे, उपप्राचार्य, डॉ. रमेश देशमुख उपप्राचार्य, तथा केंद्रसंचालक प्रा. विनोद हिवराळे, प्रबंधक सुनीलभाऊ म्हस्के, कार्यालयीन अधिक्षक रंगनाथ पैठणे, सहाय्यक केंद्रसंचालक प्रा.उत्तम वाघ, प्रा. डॉ. जितेंद्र वाघ, स्टाफ सेक्रेटरी प्रा.सिद्धार्थ पैठणे तसेच प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे तसेच पालकांचे अभिनंदन केले आहे.