जालनाच्या पोलीस अधिक्षकांची बदली; तुषार दोषी नवे पोलीस अधिक्षक…

108

मुंबई – जालनाचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे यांची नागपूर येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर पुणे येथील दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने याबाबतचे आदेश निर्गमित केले आहे.
शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी भा.पो.से. अधिकार्‍यांच्या बदलीसंदर्भातील शासन आदेश 24 मे रोजी जारी केला. या आदेशात नमूद केले आहे की, महाराष्ट्र पोलीस अधिधनयम (1951 चा 22) याच्या कलम 22 न मधील तरतुदींनुसार भा.पो.से. अधिकार्‍यांची बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे.
या आदेशानुसार जालना येथील पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांची नागपूर लोहमार्गच्या पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर पुणे येथील दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय नांदेड नागरी हक्क संरक्षणचे पोलीस अधीक्षक जयंत मीना यांची बदली पुणे दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिस अधीक्षकपदी करण्यात आली आहे.