चितळी पुतळी – रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी नेर सर्कल व ग्रामपंचायत चितळी पुतळी व राजेंद्र वांजुळे ब्लड डोनर ग्रुपच्या वतीने श्रद्धेय नेते मा.ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा रुग्णालय जालना ब्लड बँकेच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ब्लड डोनर ग्रुपच्या माध्यमातून राजेंद्र वांजुळे यांनी भुमिका माडली रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करण्याचे आवाहन केले. मुद्दामहुन कोणाचेही पाय करत रक्तपेढीकडे वळत नाहीत त्यासाठी निमित्त लागते मग ते आपल्या मुला मुलींच्या वाढदिवसाच्या असेल आपल्या श्रद्धेय नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने असेल अशा उपक्रमाच्या माध्यमातून आपण रक्तदान केलं पाहिजे अशा माध्यमातून रक्ताचा तुटवडा कमी होईल या रक्तदान शिबिरात उपसरपंच कल्याणराव उरदुखे, सदानंद दवंडे, राहुल उघडे, शरद जाधव, मिलिंद पारखे, प्रदीप दवंडे , विशाल उघडे, दत्ताभाऊ दवंडे, उमेश ठोंबरे,डॉ. अनिल कोरडे,वैभव शेळके सह अनेकांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवुन श्रद्धेय नेते मा.ॲड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला.