आराध्य सुरुसे जिल्ह्यातून तर देवयानी मोकासे तालुक्यातून प्रथम; शिराळा येथिल विदयार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षेत घवघवित यश

19

टेंभूर्णी । प्रतिनिधी – जाफराबाद तालुक्यातील शिराळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत मानाचा तुरा रोवला आहे.
राज्यभरात दरवर्षी होणार्‍या (ठ.ढ.ड.ए.) परीक्षेत शिराळा येथील जि प प्रा शा शाळेची इ 2 री ची विदयार्थीनी कु. देवयानी प्रदिप मोकाशे हीने 200 पैकी 140 गूण घेऊन तालूक्यात प्रथम व जिल्ह्यातुन 3 री आली आहे. तर इ 3 रीचा विदयार्थी आराध्य राहूलकुमार सुरूशे याने 200 पैकी 160 गूण घेऊन जिल्हयातुन प्रथम व राज्यात 10 वा येण्याचा बहुमान पटकावला आहे .या परीक्षेसाठी जि प प्रा शाळेच्या सर्वच शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे . तसेच जि.प . प्रा शा ब्रम्हपूरी येथील बी टी शिंदे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.
यावेळी गावचे सरपंच पंढरीनाथ पा शिराळकर माजी पंचायत समिती सदस्य गणेश बापू दुनगहु, उद्धव पा दुनगहु, प्रल्हाद पा जाधव, बाबासाहेब पा जाधव, गजानन पा सरडे,शालेसमिती अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य कृष्णा पा दुनगहु, पांडुरंग दुनगहु, मुख्याध्यापक सिताराम राऊत, शिक्षक मनोहर चेके, तांबेकार यांच्या सह अन्य मान्यवरांनी दोन्हीही विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर देवयानी हीने इतक्या कमी वयात स्पर्धा परीक्षा समजून घेऊन जे यश प्राप्त केले आहे. यामागे नक्किच तिचे सततचे परीश्रम कारणीभूत आहेत. अशा भावना वर्गशिक्षिका श्रीमती क्रांती मेरत मॅडम यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या.