शिवाजीनगर येथील ट्राफिक जामची अडचण कायम; अपघातात ही होतेय वाढ

46

टेंभुर्णी । प्रतिनिधी – टेंभुर्णी हे असे गावं आहे की ज्याला बस स्टँड नाही .थांबा नाही. गावात येणार रस्ता चांगला नाही. त्या मुळे येथील सगळी वाहनांची थांबण्याची ठिकाण हे येथील जाफ्राबाद जालना रोड वरील टेंभुर्णी गावातील शिवाजी नगर हे स्थान झाले आहे. येथे येणारे वाहन धारक हे जणू शिस्त विसरल्या सारखे वागतात हे विशेष. यांना कोणताही धाक राहिला नाही. आपल्या मुळे कोणाला अडचण होईल का यांचा धाक तर यांना ना पोलीस मंडळीचा धाक . कोणीही येते आणि कशी ही गाडी लाऊन येथील हॉटेल मध्ये जाऊन मनसोक्त गप्पा मारत असल्याचे खूप वेळी दिसून आले. येथे या वाहन धारकांच्या बेशिस्त वाहन पार्किंग मुळे चक्क बस येथे कितेक वेळा विनाकारण थांबण्याची परिस्थिती खूप वेळा निर्माण झाली असून. या कडे पोलीस प्रशासन यांनी कडक पाऊल उचलून यांना शिस्त लावण्याची नक्कीच गरज निर्माण झाली आहे . वाहन धारक यांच्या या आडमुठ्या धोरना मुळे खूप वेळा अपघात घडले असल्याचे येथील नागरिक सांगत आहे . चुकीचा रोड ची उंची घेतल्या मुळे नाल्या व्यवस्थित न बांधल्या मुळे गावात जाणारा रस्ता अधुरा बांधकाम करून ठेवल्या बद्दल येथील सर्वच व्यवस्था ही पार कोलमडून गेली आहे. टेंभुर्णी ची सध्या तरी अशी परिस्थिती झाली आहे का राजकारणात नाव मोठे अन् लक्षण खोटे.येथे सगळ्या गोष्टी ची कमी म्हणूनच विकासाची नाही हमी अशी सध्याची परिसथिती आहे. या सर्व बाबी कडे सार्वजनिक विभाग महाराष्ट्र शासन महसूल विभाग आणि पोलिस प्रशासन यांनी वेळीच लक्ष्य देऊन ही सर्व समस्या निकाली काढण्याची विनंती सर्व सामान्य जनता आणि वाहन धारक करत आहे की ज्यांना या मुळे खूप त्रास होत आहे.