जाफराबाद । प्रतिनिधी – जाफराबाद तालुक्यातील ब्रम्हपुरी या गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गावातील पदाधिकार्यांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतला आणि संपुर्ण गाव आंदोलनात सामील केले मयुर बोर्डे यांना बोलावून घेतले नंतर काय गावात पोलीस प्रशासन अधिकारी धावत आले तब्बल तीन तास गावात जंगी सभा झाली मयुर बोर्डे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आणि प्रशासनाला घाम फुटला,आंदोलनातील आक्रमक पवित्र्याने सहायक पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी दारू विक्री करणार्यावर कडक कारवाई करू असा शब्द दिला आणि तात्काळ समज दिला त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.गावातील महिला व गावकर्यांच्या एकजुटीने गावातील दारूबंदीचा हा लढा यशस्वी झाला.या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मयुर बोर्डे,सुभाष भोपळे, गजानन, भोपळे उपस्थित होते तर दारूबंदीसाठी सतीश नानगुडे, सुदाम शेवत्रे, राजु पठाडे, दिपक शेवत्रे, रमेश पठाडे, गजानन बरडे, वसता नानगुडे, विजय कांबळे, समाधान पैठणे, लिंबाजी केवट, वैभव शेवत्रे, कैलास बोर्डे इत्यादिसह गावकर्यांनी पुढाकार घेत परिश्रम घेतले.