खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस जाफराबाद पोलिसांनी केले अटक पोटात चाकूने वार करून करण्यात आली होती निर्घृण हत्या

24

टेंभुर्णी । प्रतिनिधी – जाफराबाद तालुक्यातील कोळेगाव येथे घराशेजारी राहणार्‍या दोन मित्रात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात मित्रानेच आपल्या मित्राच्या पोटात चाकूने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी (ता. 27 एप्रिल ) सायंकाळी सहा ला घडली होती. आरोपी शंकर संजय पवार व स्वप्नील भगवान मुळे याने चाकूने वार करत नारायण शेळके (वय 40, रा.कोळेगाव) यांचा खून केला. याप्रकरणी मयत नारायण शेळके यांच्या भावाने आरोपी विरोधात जाफराबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती . या प्रकरणी आरोपी स्वप्नील भगवान मुळे (वय 24, रा. कोळेगाव ) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सायंकाळी सात चा सुमारास कोळेगाव येथे किरकोळ कारणावरून त्यांच्यात शाब्दिक भांडण झाले. व त्या वेळी शंकर पवार व स्वप्नील भगवान मुळे या दोघांनी त्याच्या जवळ असलेल्या धारदार चाकूने नारायण शेळके यांच्यावर हा हॉटेल साई निवांत परिसरात भर रस्त्यावर चाकूने दोन ते तीन वेळेस वार करून निर्घृण हत्या केली. त्या वेळी रक्तस्राव झाला.त्या दरम्यान, त्यांना चिखली येथे खासगी दवाखान्यात हलविण्यात आले यावेळी त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या पोटात अंतर्गत व बाह्य रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.भांडणात त्यांचे दोघांचे क्षुल्लक पकारणावरून नको ते बोलणे झाले यात रागाच्या भरात आरोपी शंकर पवार (कोळेगाव वय-24) आरोपी स्वप्नील भगवान मुळे याला फोन लावत चाकू घेऊन येण्याचे सांगितले व स्वप्नील हा चाकू घेऊन आला आणि त्या दोघांनी त्यांच्या पोटात धारदार चाकूने मृत नारायण शेळके यांच्यावर वार केले यात नारायण शेळके (कोळेगाव-40) हे जागीच मृत पावले व हे प्रकरण झाल्यानंतर आरोपी स्वप्नील भगवान मुळे (वय वर्ष 24) याला अटक करण्यात आले आहे व आरोपी शंकर संजय पवार हा फरार होता..या आरोपीवर पोलीस स्टेशन जाफराबाद येथे गुरन 90/2023 कलम 302,504,34 भादवी प्रमाणे दिनांक 28/4/2023 रोजी गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्हातील फिर्यादी नामे सुरेश रामराव शेळके राहणार कोळेगाव तालुका जाफराबाद जिल्हा जालना यांनी तक्रार दिली की दिनांक 27/4/ 2023 रोजी त्यांचा भाऊ मयत नारायण रामराव शेळके याचा शंकर संजय पवार व स्वप्निल भगवान मुळे दोन्ही राहणार कोळेगाव तालुका जाफराबाद यांनी मयत नारायण रामराव शेळके याला शंकर संजय पवार याने चाकूने जबर दुखापत करून खून केला आहे यावरून पो.स्टेशन ला गुन्हा दाखल झाला असून गुन्हायातील आरोपी शंकर संजय पवार हा घटना तारखेपासून फरार होता तसेच आरोपी क्रमांक दोन स्वप्निल भगवान मुळे यास अटक करण्यात आलेली आहे. तसेच आरोपी शंकर संजय पवार याचा शोध घेणे कामे तपास पथक तयार करून छ संभाजीनगर येथे रवाना करण्यात आले होते त्यानंतर तपास पथक यांनी आरोपीचा छ. संभाजी नगर तसेच वाळूज, देऊळगाव राजा या ठिकाणी शोध घेतला असता आरोपी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले आहे व सदर गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आलेली आहे. सदर आरोपीला मा. न्यालयामध्ये हजर करण्यात येणार आहे