औरंगाबाद एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून माहितीसाठी टोल फ्री क्रमांक

71

जालना – औरंगाबाद एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील औरंगाबाद, जालना, लातूर आणि बीड जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना आधारकार्ड, शिधापत्रिका, पॅनकार्ड, बँक पासबुक, आयुष्यमान भारतकार्ड, मनरेगा नोंदणी विषयक माहिती उपलब्ध करुन घेण्यासाठी टोल फ्री क्रमांकाची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरी आधारकार्ड, शिधापत्रिका, पॅनकार्ड, बँक पासबुक, आयुष्यमान भारतकार्ड, मनरेगा नोंदणी विषयक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 18002670007 यावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.