जालना : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणा-या केन्द्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हा प्रशासन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व धरतीधन ग्रामविकास संस्था, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 एप्रिल 2023 रोजी जागतिक वसुंधरा दिवसानिमित्त औद्योगिक प्रशिक्षण संस्था जालना येथे विशेष प्रचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उदघाट्न तहसीलदार छाया पवार यांनी केले. यावेळी व्यासपीठावर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रविण उखळीकर, क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे, केन्द्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय छत्रपती संभाजीनगरचे प्रबंधक संतोष देशमुख, सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिदेशक एस एस कापसे, श्री. जुंजे आणि धरतीधन ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सावंत आदी उपस्थित होते.
तहसीलदार छाया पवार व सर्व मान्यवरांनी सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन केले. यावेळी संतोष देशमुख यांनी प्रास्ताविक केले आणि मिलिंद सावंत यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्र शासनाच्या पंजीकृत शाहीर जाधव आणि संच छत्रपती संभाजीनगर तर्फे पोवाड्याच्या माध्यमातून जनजागृतीपर व प्रोत्साहनपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. तहसीलदार छाया पवार व प्रविण उखळीकर यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे श्री.आर्दड व श्रीमती साकोते यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेतली तसेच आभार प्रदर्शन प्रदीप पवार यांनी मानले.
चित्रकला स्पर्धेचे विजेते ऋतुजा खरात, पवन पवार, दुर्गेश्वरी गोखरे, गौरी वडगावकर, रांगोळी स्पर्धेचे विजेते आरती तानगे, रीना जातोडे, आंचल नवले आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेचे विजेते दिशा पगारे, कृष्णा अदबाने, विशाल मडके यांना केंद्रीय संचार ब्युरो मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवरांनी एकत्र तंबाखू मुक्तीची शपथ घेतली. कार्यक्रमानंतर सर्वांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात वृक्षारोपण केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केन्द्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-छत्रपती संभाजीनगरचे सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार, प्रिती पवार, शरद सदिगले व प्रभात कुमार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक व कर्मचारी आणि धरतीधन ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सावंत आदींनी परिश्रम घेतले. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.