साइंटिस्ट शेख जावेद अली यांना बसपातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

10

जालना । प्रतिनिधी – जालना येथील रहिवाशी असलेले शेख जावेद अली शब्बीर
अली यांचे पुणे रूबी हॉस्पीटल मध्ये नुकतेच दि.16 एप्रिल 2023 रोजी निधन
झाले. मागील 5 महिन्यांपासून ब्रेन ट्युमर या आजारापासून त्रस्त होते.
दि.16 एप्रिल 2023 रोजी दुपारी 3 वाजता दर्गा शेरस्वार कब्रस्तान येथे
त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. त्यावेळी नातेवाईक, मित्र यांची मोठ्या
संख्येने उपस्थिती होती.
शेख जावेद अली हे एन.आय.सी. केंद्र सरकार या विभागाचे साइंटिस्ट एफ या
पदावर पुणे केंद्रीय शुल्क विभागामध्ये जाँईट कमिशनर म्हणून कार्यरत
होते. त्यांना केंद्रीय उत्पादन शुल्क विभागातर्फे उत्कृष्ट कामगिरीमुळे
विश्‍वस्तरीय केंद्र सरकारकडून दि.27 जानेवारी 2017 ला अरूण जेटली
यांच्या द्वारे सन्मानित करण्यात आले होते.
जावेद अली हे स्वतंत्र सैनिक शब्बीर अली यांचे चिरंजीव होते तसेच फेरोज
अली मौलाना यांचे ते धाकटे भाऊ होते. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन
मुले, 5 भाऊ, 4 बहिण असा मोठा परिवार आहे. ते जालना रेल्वे स्टेशन या
ठिकाणी राहत होते.
यावेळी प्रदेश सचिव प्रभात खिल्लारे, रमेश उबाळे, भिमराव आढावे, विनोद
बिरसोने, किशोर बोरूडे, संजय खरात, दिपक डोंगरे, राहुल करनाडे, शेख
फेरोज, राम जोहरे, सागर चाऊस, मोहमंद एजाज, अकबर चौधरी व मोठ्या संख्येने
नातेवाईक उपस्थित होते. शेख जावेद अली बसपा तर्फे श्रद्धाजंली अर्पण
करण्यात आली.