शिवसेना, युवासेना व शिवसेनेच्या सलग्न संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना युवा सेना महिला आघाडी ,दलित आघाडी च्या कार्यकर्त्यांनी आपापला विभागात नव्याने शाखा स्थापन कराव्यात व संघटन वाढीसाठी प्रयत्न करावे. तसेच शिवसेना पक्षाची जास्तीत जास्त नोंदणी करून घेऊन आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याचे काम करावे. असे शिवसेना उपनेते माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी भाग्यनगर संपर्क कार्यालयात आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले .पुढे बोलताना खोतकर साहेब म्हणाले की कार्यकर्त्यांनी आपापल्या विभागात ज्येष्ठ नागरिकांच्या व इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घ्याव्यात या बैठकांना माझ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवावे आणी त्या भागातील समस्या जाणून घेण्यात याव्यात जेणेकरून समस्या सोडवण्यासाठी सुलभ होईल .या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. कार्यकर्त्यांनी आपल्या विभागातील विकास कामाचे प्रस्ताव सादर करावे .शासन आपले आहे ते मंजूर करून घेण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. तसेच शासनाने घेतलेले निर्णय जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सतर्क रहावे. बुथ
प्रमुखाच्या नेमणुका कराव्यात. बुथ प्रमुखासह गटप्रमुख ,विभाग प्रमुख ,शाखाप्रमुख यांनी सतत जनसेवीची कामे करण्यासाठी अग्रेसर राहावे असे सांगितले. यावेळी सहसंपर्कप्रमुख एडवोकेट सुनीलजी किनगावकर युवा सेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अभिमन्यू खोतकर,
जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले, आत्मानंद भक्त,उपजिल्हाप्रमुख संतोषराव मोहीते महिला आघाडी जिल्हाप्रमुख कालींदाताई ढगे,मखजी पंस.स. पांडुरंग डोंगरे, अँड भास्कर मगरे दलित आघाडी प्रमुख अल्पसंख्याक आघाडी प्रमुख जावेदभाई, युवा सेना जिल्हाप्रमुख अमोल ठाकूर,शलैश घुमारे, तालुकाप्रमुख भगवान अंभोरे, उपजिल्हाप्रमुख गणेश मोहिते भक्त सविता केवंडे युवा सेनेचे शहर प्रमुख योगेश रत्नपारखे दिनेश भगत आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी युवासेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अभिमन्यू खोतकर ,एडवोकेट सुनील किनगावकर ,जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे ,शहर प्रमुख विष्णु पाचफुले,महिला आघाडी प्रमुख कालींदाताई ढगे, योगेश रत्नपारखे ,यांनी देखील मार्गदर्शन केले या कार्यक्रमास नगरसेवक किशोर पांगारकर, गोपी गोगडे, निखिल पगारे,बाबुमामा जाधव,संताजी वाघमारे, यांच्यासह विभाग प्रमुख किशोर शिंदे ,मनोज लाखोले, दिपक राठोड ,कांता रांजणकर, भरत कुसुंदल, सशील भावसार,संतोष परळकर ,मेघराज चौधरी ,अमोल राऊत ,कुणाल जाधव,संजय डुकरे, मयूर एखंडे ,कैलास गायकवाड , जगदीश रत्नपारखे ,विजाताई चौधरी, संगीता नागरगोजे, छायाबाई जराड,दुर्गा देशमुख, राधाबाई वाढेकर, देवेंद्र बुंदले अभिषेक काबलिये , पांडुरंग खैरे, महादेव वाघमारे ,अक्कू भाई, ताहेर खान पठाण, बडे खा पठाण, रामेश्वर देवडे ,राम खांडेभराड ,गौरव नवगिरे, दीपक हवाले ,गोविंद सोनवणे, संजय शर्मा,अभिजीत मस्के, बालाजी पवार ,गणपत धोत्रे ,हंसराज बटावले ,दशरथ तोंडुळे,अंकुश शितोळे, दत्ता पवार ,अभिजीत साळुंखे , नरेश खुदबैय ,बबन मगरे, सुरेश चव्हाण ,मुसा परसुवाले ,शिवाजी शेळके, पिटर खंदारे,सखाराम लंके, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.सुत्रसंचलन शहरप्रमुख विष्णु पाचफुले यांनी केले व अआत्मानंद भक्त
यांनी शेवटी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.