जालना- बदनापुर तालुक्यातील रोषणगाव येथील मदीना मस्जीद जवळील रस्ता खोदकाम करून रस्त्यावर काटे टाकुन बंद केल्याने दोन गटात दि.12 रोजी रात्री 11 व दि. 13 रोजी सकाळी 9 ते 10 च्या सुमारास तुफान हाणामारी झाली आहे. या हाणामारीत 8 ते 10 जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रोषणगाव येथील मदीना मस्जीद जवळील रस्ता खोदकाम करून रस्त्यावर काटे टाकुन बंद केल्याने दोन गटात दि. 12 रोजी रात्री किरकोळ हाणामारी झाली. त्यानंतर एका गटाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यामुळे समोरील गटाने दि. 13 रोजी माणसे बोलावुन त्या गटावर हल्ला केला. यामुळे दोन्ही गटात चांगलीच हाणामारी झाली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले.
फिर्यादी सादिक शब्बीर कुरेशी रा. रोषणगाव यांच्या फिर्यादीवरून 1) शगिर बशीर सय्यद, 2) समीर बशीर सय्यद, 3) बाशु महेबुब सय्यद, 4) बशीर महेबुब सय्यद, 5) ईम्रान बाशु सय्यद, 6) शकुर निजाम शेख सर्व रा. रा. रोषणगाव ता. बदनापूर यांच्यावर बदनापूर पोलीस ठाण्यात कलम कलम 143, 147, 148, 324, 323, 504, 506 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला तसेच सगिर बशीर सय्यद रा. रोषणगाव यांच्या फिर्यादीवरून 1) सादिक शब्बीर कुरेशी, 2) समीर शब्बीर कुरेशी, यांच्यावर कलम 324, 341, 323, 504, 506, 34 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला, यावेळी पोलिसांनी घटनास्थळावरून कुर्हाड, लोखंडी गज, लाठ्या- काठ्या आदी साहित्य जप्त करून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.