टेंभुर्णी । प्रतिनिधी – विश्वरत्तन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त व महात्मा ज्योतीराव फुले यांच्या 196 व्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ नगर येथिल लुंबुनी बौद्ध विहारात दिनांक 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त टेंभूर्णी पोलिस स्टेशनच्या हेड कॉन्स्टेबल वसुंधरा भांडेकर मॅडम व दिनांक 12 एप्रिल रोजी सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्रा.मदन मगरे सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेस जाफराबाद शहरातील व तालुक्यातील सर्व बहुजन बाधंवानी व सिद्धार्थनगर आंबेडकर नगर, सम्राट अशोक नगर, नागसेन परीसरातील सर्व फुले शाहु आंबेडकर विचार धारेतील बांधवांना व भगीनिंना सिद्धार्थ नगरच्या जयंती उत्सव समीतीच्या वतीनं आग्रहाची विनंती करण्यात येत आहे. आपन सर्व फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या बांधवांनी व माता भगिनींनी दिनांक 11 एप्रिल व 12 एप्रिल रोजी संध्याकाळी ठिक 6=30 वाजता लुबुंनी बौद्ध विहारात वरील दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहुन बाबासाहेब आंबेडकर यांच्या व महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे..असे आवाहन आयोजक समितीचे अध्यक्ष व पदधिकारी यांनी केले आहे.