जाफराबाद । प्रतिनिधी – जाफराबाद तालुक्यातील वरुड बु. मंडळातील सततच्या पावसामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले मात्र वरुड बु.वघळता इतर चारही मंडळात ओला दुष्काळात समावेश झाला मात्र वरुड बु.मंडळ यातुन डावळल्या गेल्यामुळे शेतकर्यांनी आपल्या व्यथा भाजपा जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे यांच्याकडे मांडल्या व शासकीय मिळावे या मागणीचे निवेदन त्यांना दिले.
यावेळी वरुड बु मंडळातील सर्व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यात वरुड बु कोनड कोळेगाव खासगाव सांजोळ आनंदवाडी डोलखेडा सोनखेडा सावरखेडा गोंधनखेडा भरडखेडा रास्तळ वानखेडा भारज बुद्रुक भारज खुर्द कुसळी अंधारी आढा पासोडी सवासनी सिंधी गोपी खापरखेडा सोनगिरी या गावातून जवळपास एक हजार शेतकर्यांच्या वतीने आ.संतोष दानवे यांना निवेदन देण्यात आले यावेळी चेअरमन विजयनाना तथा नानाभाऊ भागिले परिहार , उपसरपंच प्रेमसिंग धनावत यांनी या मंडळात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची आ.दानवे यांना सविस्तर माहिती दिली.
यावेळी आ.दानवे यांनी सांगितले की आपल्या भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघामध्ये दोन मंडळ वरुड बु जाफराबाद आन्वा ता. भोकरदन हे मंडळाचे दुष्काळी अनुदानापासून वंचित असल्याने शासन दरबारी तातडीने दुष्काळी अनुदान मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वत्र प्रयत्न करत आहोत आणि या संदर्भात केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि मी पण या संदर्भात सभागृहात विषय मांडलेला आहे आणि यासंदर्भात राज्यांमध्ये अनेक मंडळ हे दुष्काळाचा वंचित असल्याने तातडीने शासनाकडून या संदर्भात मदत मिळून देण्यासाठी सर्वच आमदार केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे मी स्वतः लक्ष देऊन आहे लवकरात लवकर कशी मदत, अनुदान शेतकर्यांना मिळून देण्यासाठी आम्ही सर्वतो प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले .यावेळी वरुड बु मंडळातील शेतकरी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.