अकोला देव येथे सेवानिवृत्त सैनिकाचे स्वागत

20

टेंभुर्णी । प्रतिनिधी – जाफराबाद तालुक्यातील सर्वात जास्त देश सेवेसाठी कार्यरत असलेले सैनिक ज्या गावातून आहेत त्या गावातील तीस वर्ष ज्यांनी देश सेवा केली असे सैनिक श्री मोहन रामराव सवडे यांची सेवानिवृत्ती कार्यक्रम गावातील सर्व मंडळींनी एकत्रित येत थाटामाटा मध्ये साजरा केला. सदरील कार्यक्रमांमध्ये गावातील मंडळींनी गावाच्या प्रवेश या ठिकाणी तसेच समस्त गावभर रांगोळी काढून व औक्षण करून सर्व देवी देवतांचे दर्शन घेत व सर्व महामानवांना अभिवादन करत गावभर वाजत गाजत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ लहान थोर सर्व मंडळी सहभागी होती त्यानंतर त्यानंतर सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री मुठ्ठे साहेब, थोटे साहेब कृ.ऊ.बा.समिती संचालक शंकर सवडे, दादाराव सवडे माजी प. स. सदस्य,सरपंच शुभम घोडसे,उपसरपंच डॉ रामेश्वर सवडे, ग्रामपंचायत सदस्य भुजंगराव सवडे,छबुराव कदम,खंडूभाऊ सवडे,शाहुल छडीदार,विठ्ठल सवडे, संजय राठोड तसेच माजी सैनिक दशरथ जाधव,भास्कर सवडे,विष्णू सवडे,रामगिर गिरी,कौतिकराव सवडे, पुंजाराम कांबळे,अण्णा बापू सवडे व सध्या सैन्य दलात कार्यरत असलेले निलेश सवडे,नितीन सवडे,संदीप कांबळे,आकाश सवडे,योगेश कदम,कृष्णा सवडे,सचिन दहातोंडे, माजी सैनिक महिला आघाडी तालुकाध्यक्षा वंदना सवडे, विष्णू सवडे, ऋषिकेश सवडे व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विठ्ठल साहेबराव सवडे यांनी केले तर आभार प्रदर्शन समाधान हरिभाऊ सवडे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व आजी माजी सैनिक व नवतरुण मंडळी यांनी विशेष परिश्रम घेतले.