‘होय, मी सावरकर’ घोषणांत लक्षवेधी आंदोलन सावरकरांविरोधात बेताल वक्तव्य करणार्‍यांची मुस्काटं फोडू – सुर्यवंशी

10

जालना । प्रतिनिधी – शहरातील वीर सावरकर चौक येथे ‘होय, मी सावरकर’ या घोषणा देत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात बेताल वक्तव्य करणार्‍यांचे मुस्काटं फोडु असा ईशारा हिंदु महासभेचे प्रदेश संघटनमंत्री हिंदु शौर्य धनसिंह सुर्यवंशी यांनी दिला आहे.
शहरातील वीर सावरकर चौक येथे अखिल भारतीय हिंदु महासभा देवगिरी प्रांतचे प्रमुख ईश्‍वर बिल्लोरे, सुखलालसिंह राजपुत, कालुसिंह राजपुत यांच्या नेतृत्त्वात मंगळवार (दि 4) रोजी ‘होय, मी सावरकर’ घोषणांत लक्षवेधी आंदोलन पार पडले. यावेळी श्री सुर्यंवशी बोलत होते.
यावेळी पुढे बोलतांना श्री सुर्यवंशी म्हणाले की, हिंदुसंघटन वीर सावरकर हे हिंदु महासभाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष होते. काही राजकारणी हे अर्धवट अभ्यास करून अथवा ऐकून बेताल वक्तव्य करतात. या पुढे असे झाल्यास हिंदु महासभाचे हिंदु सैनिक त्याचे मुस्काट फोडेल. व त्याला न्यायालयात खेचण्याचा ईशाराही श्री सुर्यवंशी यांनी यावेळी दिला.
आंदोलकांनी सावरकर, सावरकर ‘होय, मी सावरकर’ या घोषणा दिल्या.
सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलकांच्या मागण्या व भावना प्राशसनस्तरावर पोहचविण्याची ग्वाही दिली. यावेळी महिला पो.नि. मंगला सुडके, डीएसबीचे सय्यद शौकत व सोनवणे यांची उपस्थिती होती.
आंदोलनात तुकाराम मिसाळ, योगेश वर्मा, नारायण त्रिंबके,अशोक भगुरे, राजुसिंह राजपूत, देविसिंह वर्मा, युवराज राजपूत, विशाल ठाकुर, गोगडे, बजरंग राजपूत, सतिष प्रभारी, विनायक राजपूत, रवि शिखरे, पप्पू राजपूत, बालाजी यादव, अभिजितसिंह राजपूत, शंतनु गडकरी यांच्यासह हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.