जालना – येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृषी महोत्सवात धरती धन ग्रामविकास संस्थेने कृषी क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामाचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे
त्याबाबत अधिक माहिती अशी की जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालय एकात्मिक कृषी व्यवस्थापन यंत्रणा जालना आणि महिला आर्थिक विकास महामंडळ जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जालना जिल्ह्यातील बचत गटातील महिलांनी व शेतकरी उत्पादक गटांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते व पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत उत्साहात करण्यात आले यावेळी आमदार राजेश राठोड आमदार नारायण कुचे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा मीना, कृषी विभागाचे अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे आत्माच्या प्रकल्प संचालक श्रीमती शितल चव्हाण माकर माबींचे जिल्हा समन्वय उमेश कहाते यांची विशेष उपस्थिती होती या महोत्सवात विविध व्यापार्यांचे कृषी विषयक उत्पादनांचे स्टॉल्स कृषी विज्ञान केंद्र आणि स्थापित केलेल्या बचत गटांची तसेच धरती धन ग्रामविकास संस्थेने संघटित केलेल्या हायटेक ऍग्रो सेविंग ग्रुप. सार्थक हळदी आणि मसाले पावडर यासह दामिनी स्वयंसहायता महिला बचत गटाचे खाद्यपदार्थाचे स्टॉल्स तसेच सासर मसाले यासह विविध बचत गटातील महिलांनी तयार केलेले झुणका भाकर मडक्यावरील मांडे वडापाव व महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांना विशेष स्थान या महोत्सवात मिळाले धरती धन ग्राम विकास संस्थेने संघटि केलेल्या बचत गटांना कृषी विभागाने वतीने महोत्सवात केलेल्या विशेष योगदानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सावंत संतोष दाभाडे कविता सदावर्ते वंदना दाभाडे, मिलींद सदावर्ते, रुपाली साळवे, आकाश सदावर्ते, आम्रपाली रणशुर, आचारी शिंदे, माया बावरिया, अनिकेत सावंत यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.