जालना | प्रतिनिधी – भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवनिमित्त आचार्य ज्ञानसागर पाठशाळेच्यावतीने दि. 30 मार्च सदर बाजार भागातील श्री श्रेयांशनाथ दिगंबर जैन मंदिरात सकल जैन समाजातील 0 ते 16 वर्ष वयोगटातील मुलांसाठी आयोजित मोफत स्वर्ण प्राशन शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
सकाळी 9 ते 1 आणि सायंकाळी 7 ते 10 अशा दोन सत्रात घेण्यात आलेल्या या शिबिरात 425 मुलांना सुवर्णप्राश डोस देण्यात आले. त्यात सात जुळ्या मुलांचा समावेश आहे. अंबड येथूनही एक महिला तीन महिन्याच्या बालकाला डोस देण्यासाठी शिबिरात आली होती.नपुष्य नक्षत्रावर स्वर्ण प्राशन अतिशय लाभदायक असल्याने या मुहूर्तावर शिबिर घेण्यात आले. सुवर्ण प्राशन हे 16 संस्कारांपैकी एक आहे. स्वर्ण प्राशनामुळे मुलांची स्मरणशक्ती, रोगप्रतिकार क्षमता वाढते. तसेच बुद्धी तल्लख बनून शरीर सुदृढ बनते.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी महिला मंडळाच्या अध्यक्षा शोभादेवी पाटणी, आचार्य ज्ञानसागर पाठशाळेच्या अध्यक्ष सुषमा पाटणी, वर्षा छाबडा, सरिता जैन, रुही कासलीवाल, प्रीती छाबडा, संगीता लव्हाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.