जालना । प्रतिनिधी – महाराष्ट्र भूजल पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनासाठी महाराष्ट्र भूजल(विकास व व्यवस्थापन) अधिनियम 2009 मधील प्रकरण-4 चे कलम 25 नूसार प्रस्तावित क्षेत्रातील 116 गावास टंचाई क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच कलम 20 नूसार प्रस्तावित जिल्ह्यातील 116 गावाच्या क्षेत्रातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत घोषित करुन कलम 21 नूसार 500 मीटरच्या आत पिण्याच्या पाण्याशिवाय स्त्रोत निर्माण करणे तसेच त्यातून पाणी उपसा करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जारी केले आहेत.
जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील 17 गावे, अंबड तालुक्यातील 17 गावे, बदनापूर तालुक्यातील 5 गावे, मंठा तालुक्यातील 45 गावे, भोकरदन तालुक्यातील 9 गावे, परतुर तालुक्यातील 20 गावे आणि जालना तालुक्यातील 3 गावे अशा एकुण 116 गावात टंचाईग्रस्त क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व टंचाईग्रस्त गावात दि. 30 जून 2023 पर्यंत या पाणलोट क्षेत्राची सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या उदभवावर प्रतिकुल परिणाम करणार्या विहिरीमधील पाणी उपसा करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
जालना जिल्ह्याच्या जाफ्राबाद तालुक्यातील वरखेडा विरो, काळेगाव, माहोरा, बेलोरा, नांदखेडा / किन्ही, येवता, जानेफळ पंडीत, टेंभूर्णी, तपोवन गोंधन, देळेगव्हाण, पोखरी, कुसळी, पापळ, दहीगाव, कोनड बु., भराडखेडा, सोनखेडा, अंबड तालुक्यातील नागझरी, चिकनगाव, माहेर भायगाव, कर्जत, पराडा, टाका, पारनेर, किनगाव वाडी, लोणार भायगाव, कौडगाव, ढालसखेडा, खेडगाव, भालगाव, जोगेश्वरवाडी, दुनगाव, रामनगर, बक्षाची वाडी, बदनापूर तालुक्यातील कंडारी खु, किन्होळा, चिखली, चनेगाव, धामणगाव, मंठा तालुक्यातील गुळखंड, कठाळा खू, तळतोंडी/ मुरूमखेडा, पिंपरखेडा खराबे, दुधा, सासखेडा, बरबडा, वाई, टोकवाडी, पांगरी खु, नायगाव, तळेगाव, दहिफळ खंदारे, मंगरूळ, पोखरी टकले, पाटोदा बु, पाटोदा खू, पांगरी बु, माहोरा, सोनुनकरवाडी, धोंडी पिंपळगाव, वाटूर तांडा, लिंबे वडगाव, बेलोरा, जयपूर , माळकिनी, गेवराई, कोकरांबा, वाघाळा, शिरपूर, पांगरी गोसावी, हेलस, पिंपरखेडा खराबे, जांभरुण, उमरखेडा, केदारवाकडी, देवठाणा मंठा, किनखेडा, वडगाव सरहद, वरुड, वाघोडा, माळतोंडी, वाघोडा तांडा, पांगरा ग, कटाळा बू, भोकरदन तालुक्यातील जवखेडा खू, जवखेडा बु, समर्थ नगर, हिसोडा बु, मनापूर, तांदुळवाडी, सावखेडा, गारखेडा/जोमाळा, वालसा डावरगाव, परतुर तालुक्यातील वैजोडा, आनंदवाडी, पांडे पोखरी, येणोरा, वाढोणा, रेवलगाव, पाटोदा माव, ढोकमाळ तांडा, परतवाडी, ब्राह्मणवाडी, हास्तुर तांडा, सिरसगाव, अकोली, रायपुर, दैठणा बू, श्रीष्टी तांडा, सुरुमगाव, सिंगोना, बाणाचीवाडी/वडारवाडी, खांडवीवाडी ही गावे आणि जालना तालुक्यातील गुंडेवाडी, देवमूर्ती, गवळीपोखरी ही गावे अशा एकुण 116 गावात टंचाईग्रस्त क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे.
या सर्व टंचाईग्रस्त गावात दि. 30 जून 2023 पर्यंत या पाणलोट क्षेत्राची सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या उदभवावर प्रतिकुल परिणाम करणार्या विहिरीमधील पाणी उपसा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचा भंग केल्यास महाराष्ट्र भुजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम 2009 मधील तरतुदीनूसार योग्य ती दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.