स्वतंत्र मराठवाड्यासाठी ‘हिंदु महासभा’ ने पुढाकार घ्यावा – प्रा. उगले प्रांतवाद आम्हाला मान्य नाही; प्रस्ताव फेटाळला – बिल्होरे

21

जालना । प्रतिनिधी – स्वतंत्र मराठवाड्यासाठी हिंदु महासभेने पुढाकार घ्यावा असे मत मराठवाडा मुक्ती मोर्चाचे प्रा. बाबा उगले यांनी येथे केले. यावर हिंदु महासभेा देवगिरे प्रांतचे ईश्वर बिल्होरे यांनी हा प्रस्ताव तात्काळ फेटाळला असून प्रांतवाद आम्हाला मान्य नसल्याचे श्री बिल्होरे यांनी येथे स्पष्ट केले.
हिंदु महासभाचे प्रदेश संघठन मंत्री धनसिंह सुर्यवंशी यांच्या निवासस्थानी मराठवाडा मुक्ती संग्रामचे सर्वेसर्वा प्रा. बाबा उगले यांनी भेट दिली या दरम्यान झालेल्या चर्चेत प्रा. उगले यांनी हा स्वतंत्र्य मराठवाड्याचा प्रस्ताव पुढे केला होता. दरम्यान प्रा उगले यांचे परम पवित्र भगवा ध्वज देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रा. उगले यांनी स्वतंत्र मराठवाडा मागणी संदर्भातील विचार व्यक्त केले. त्यानंतर हिंदु महासभा देवगिरि प्रांतचे ईश्वर बिल्होरे प्रांतवादाला खतपानी घालनारे विष पेरीत असल्याचे म्हणत प्रांतवाद आम्हाला मान्य नाही त्यामुळे असे प्रस्ताव आम्ही स्विकारत नसल्याचे स्पष्ट केले.
प्रसंगी श्री सुर्यवंशी हे म्हणाले की, अपेक्षित विषयांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. वीर सावकर यांना अपेक्षाकृत हिंदु ध्वज व हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी हिंदु महासभा महत्त्वपूर्ण भूमिका निभावते आहे आणि या पुढेही त्यात तसुभरही कमी होणार नाही. हिंदु राष्ट्र निर्माण होण्यासाठी आम्ही आग्रही असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.