जालना – श्रीराम नवमी उत्सवाच्या निमित्ताने दि.30 मार्च 2023 रोजी जालना शहरात पारंपारिक मार्गाने मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणूकीच्या वेळी मिरवणूकीस अडथळा निर्माण होवू नये, रस्ता मोकळा राहावा व रस्त्यावर वाहने उभी करुन मार्गात अडथळा निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यादृष्टीने वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. तरी श्रीराम नवमी उत्सवाच्या मिरवणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये जालना शहरातील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला असून पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी जारी केले आहेत.
आदेशानूसार गुरुवार दि. 30 मार्च 2023 रोजी श्री राम नवमी उत्सव मिरवणुकीच्या अनुषंगाने वाहतुक नियमन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे. 1) मोतीबाग कडुन शनिमंदीर गांधीचमन मार्गे नविन जालना मध्ये जाणारी वाहतुक ही मोतीबाग, सिटीझन टी पॉईन्ट, भोकरदन नाका, बसस्थानक या मार्गे जाईल व येईल. 2) अंबड चौफुली नुतन वसाहत कडुन शनिमंदीर गांधीचमन मार्गे नविन जालना मध्ये जाणारी वाहतुक ही मोतीबाग , सिटीझन टी पॉईन्ट , भोकरदन नाका , बसस्थानक या मार्गे जाईल व. 3) रेल्वे स्टेशन , नगर परीषद , गांधीचमन मार्गे मंमादेवी व नविन जालना मध्ये जाणारी वाहतुक ही रेल्वे स्टेशन, नुतन वसाहत, अंबड चौफुली, मंठा चौफुली , नाव्हा चौफुली , जिजामाता प्रवेशद्वार मार्गे जाईल व येईल. 4) माळीपुरा, दिपक हॉस्पीटल , टाऊन हॉल परीसरातील गांधी चमन मार्गे मंमादेवी , नविन जालना मध्ये जाणारी वाहतुक ही दिपक हॉस्पीटल जवळुन जामा मस्जीद चौक , कैकाडी मोहल्ला , राजाबाग सवार दर्गा , रामतीर्थ मार्गे किंवा जामा मस्जीद चौक , विठ्ठल मंदीर , पेशवे चौक , लक्कड कोट मार्गे जाईल व येईल. 5) रेल्वे स्टेशन , निरामय हॉस्पीटल, मंमादेवी मार्गे नविन जालना मध्ये जाणारी वाहतुक ही निरामय हॉस्पीटल जवळुन सुभद्रा नगर, ग्लोबल गुरुकुल , मंठा चौफुली, नाव्हा चौफुली , जिजामाता प्रवेशद्वार मार्गे जाईल व येईल. 6) बसस्थानकावरुन , फुलंब्रीकर नाट्यगृह आणि, ट्राफीक ऑफीस रोडकडुन येणारी व सुभाष चौक मार्गे मंमादेवी, जुना जालना मध्ये जाणारी वाहतुक ही बसस्थानकवरुन, लक्कडकोट, पेशवे चौक, विठ्ठल मंदीर, जामा मस्जीद चौक, दहपक हॉस्पीटल किंवा रामतीर्थ , राजाबाग सवार दर्गा, कैकाडी मोहल्ला, जामा मस्जीद चौक मार्गे जाईल व येईल. 7) छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मुर्तीवेस , सराफा बाजार , काद्राबाद , पाणीवेस , सुभाषचौक मार्गे मंमादेवी, जुना जालनामध्ये जाणारी वाहतुक ही गुरु गोविंदसींग नगर, रामनगर, गांधी नगर, बायपास रोड अंबड चौफुली, नुतन वसाहत मार्गे जाईल किंवा मंगळ बाजार , चमडा बाजार , राजमहेल टाँकीज जवळील पुलावरुन, ग्लोबल गुरुकुल, अंबड चौफुली , नुतन वसाहत मार्गे जाईल. किंवा मंगळ बाजार, चमडा बाजार, राजमहेल टॉकीज जवळील पुलावरुन सुभद्रा नगर , सोनल नगर , निरामय हॉस्पीटल मार्गे जाईल व येईल. 8) सदर बाजार, सिंधी बाजार, रहेमान गंजकडुन येणारी व मामा चौक मार्गे, सुभाष चौक, मंमादेवी जुना जालनामध्ये जाणारी वाहतुक ही जुना मोंढा, दिपक वाईन शॉप , बसस्थानक , लक्कडकोट, पेशवे चौक , विठ्ठल मंदीर , जामा मस्जीद चौक , दिपक हॉस्पीटल किंवा रामतीर्थ , राजाबाग सवार दर्गा , कैकाडी मोहल्ला , जामा मस्जीद चौक मार्गे जाईल व येईल. 9) मंठा चौफुली , गुरुबचन चौक कडुन येणारी व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे बडीसडक, सदर बाजार बसस्टँण्डकडे जाणारी वाहतुक ही गुरुबचन चौक, जिजामाता प्रवेशद्वार, झाशीची राणी पुतळा मार्गे जाईल व येईल. 10) रामनगर , गांधी नगर येथुन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे बडी सडक, सदर बाजार, जवाहरबाग चौकीकडे जाणारी वाहतुक ही रामनगर, आझाद मैदान, गुरुबचन चौक, जिजामाता प्रवेशद्वार, झाशीची राणी पुतळा, जेईएस कॉलेज, बाबुराव काळे चौक मार्गे जाईल व येईल. गुरुवार दि.30 मार्च 2023 रोजी दुपारी 12 वाजेपासून श्रीराम नवमी उत्सव मिरवणूक संपेपर्यंत अंमलात राहील. असेही आदेशात निर्गमित करण्यात आले आहे.