नेहरू युवा केंद्र तर्फे जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन

21

जालना : नेहरु युवा केंद्र जालना यांच्यातर्फे रविवार दि.26 मार्च 2023 रोजी पार्थ सैनिकी शाळा , खरपुडी रोड येथे सकाळी 9 वाजता जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये 100 मीटर धावणे, गोळाफेक, लांब उडी, व्हॉलीबॉल व कब्बडी या विविध खेळाचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत आधार कार्ड व पासपोर्ट फोटो घेऊन येणे अनिवार्य असुन जिल्ह्यातीत इच्छुक खेळाडुंनी व संघानी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.