जालना : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त दि. 24 मार्च 2023 रोजी जिल्हा क्षयरोग केंद्र , जालना या कार्यालयाच्या वतीने जालना शहरात भव्य क्षयरोग जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अश्वमेध जगताप यांच्या हस्ते रॅलीस हिरवी झेंडी दाखवुन रॅलीची सुरुवात करण्यात आली.
रॅलीमध्ये वसंतराव नाईक नर्सिंग स्कुल जालना , परिचर्या प्रशिक्षण केंद्र जालना , महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय जालना , मिशन हॉस्पिटल जालना या कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षकवृंद व एनटीईपी कर्मचारी सहभागी झाले होते. क्षयरोग जनजागरण रॅली जिल्हा क्षयरोग केंद्र जालना येथुन निघुन सतकर कॉम्प्लेक्स, अंबड चौफुली मार्गे जिल्हा परिषद जालना येथे पोहोचुन रॅलीची सांगता करण्यात आली.
जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद, जालना या ठिकाणी क्षयरोग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्षयरोग जीवाणु संशोधक डॉ. रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ अश्वमेध जगताप, अति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. म्हस्के, उद्योजक रमेशभाई पटेल, उद्योजक घनशामदास गोयल, उद्योजक दिनेश भारुका, उद्योजक डी.बी. सोनी, व्यवस्थापक तळेकर, उद्योजक आदर्श भारुका, डॉ. श्रीमंत मिसाळ, डॉ . रमेश काकड व डॉ . राम देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले की, भारत सरकारने 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत करण्याचे उदिष्ट्य ठेवलेले असुन सर्व आरोग्य यंत्रणेने क्षयरुग्णांचे तात्काळ संशयीत क्षयरुग्ण शोधुन त्वरीत निदान व औषधोपचार देऊन क्षय रुग्णांना बरे करावे जेणेकरुन क्षयरोग मुक्त भारत करण्यास मदत होईल . जालना जिल्ह्यातील स्टील असोसिएशन जालना व विक्रम टि प्रोसेसर यांनी प्रधानमंत्री टिबीमुक्त भारत अभियानांतर्गत उपचारावर असणार्या क्षयरुग्णांना पाच हजार पोषण किट वाटप केल्याबद्दल त्यांचे आभार मानुन यापुढे ही कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविण्याबाबत आवाहन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी समाजामध्ये क्षयरोगाबाबत जास्तीत जास्त प्रसिध्दी करावी जेणेकरून समाजातील सर्व नागरीकांना क्षयरोगाबाबत माहिती मिळेल असे सांगितले. डॉ . अश्वमेध जगताप जिल्हा क्षयरोग अधिकारी जालना यांनी राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमीत्त आयोजित स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविलेल्या विद्यार्थांना व राष्ट्रीय क्षयरोग दुरिकण कार्यक्रमामध्ये उत्कृष्ठ कार्य करणार्या अधिकारी व कर्मचारी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशोर आघाम यांनी केले तर विलास जवळेकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जी.जी. लोखंडे, एस . व्ही यादव, एस . एस . खंडागळे, व्ही. जी. जवळेकर, डी. एस. जावळे, जी के वावरे, गोपाल राऊत, अमोल निकस, वैजनाथ मुंडे, श्री. गरगडे, श्री. कादरी, श्री पठाण, डी. आर. रगडे, आशिष ओझा, श्री. बजगुडे , सविता वैद्य, श्री. बजगुडे, श्री सुधिर गालफाडे, वर्षा दाभाडे, श्री. बनकर, गणेश सुर्यवंशी, श्री. एंगडे, श्री. कठाळे, श्रीमती आडबोले, सरला पाटील, हंसाबाई सलामपुरे, पल्लवी अळसपुरे, श्री.बोबडे, श्री. शहाणे, श्री. राजाळे, श्री. कांबळे यांनी परिश्रम घेतले.