जालना – शहरात कर्कश आवाज करणाऱ्या 13 बुलेट गाड्यांवर पोलिसांनी कारवाई केली. मागच्या काही दिवसांत जालना शहरात जोरात आवाज करणाऱ्या बुलेट गाड्यांच्या तक्रारी वाढल्या होत्या.त्यानुसार आज पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि मामा चौकात कारवाई करत 13 बुलेट गाड्या जप्त केल्या आहेत. यामध्ये बुलेट चालकांनी कंपनीचं सायलेन्सर काढून जोरात आवाज करणारे सालेन्सर लावले आहेत. त्यामुळं पोलिसांनी या गाड्यांचे सायलेन्सर काढून टाकत कंपनीचे सायलन्सर लावून घेतले. ज्या बुलेट चालकांकडे कंपनीचे सायलन्सर नव्हते त्यांना तात्काळ नविन सायलन्सर खरेदी करण्यास पोलीसांनी भाग पाडले त्यामुळे बुलेट चालकांना साडेतीन ते चार हजाराचा नगदी भुर्दंड बसला. त्याचबरोबर पोलीसांनी प्रत्येकी एक हजार रुपये दंडही वसूल केला आहे.
अशा कारवाई यापुढेही चालू राहणार असून नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीच्या आवाज करणारे सायलेन्सर लावू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. पोलीसांच्या या कारवाई मुळे सर्वसामान्य नागरीकांमध्ये समाधान व्यक्त होत असून शहरातील वेगवेगळ्या भागात अशि प्रकारच्या कारवाया चालू ठेवाव्या अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहेत.
सदरील कारवाई मा.पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, उपविभागिय पोलीस आधिकारी निरज राजगुरू,यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पो.निरि. गुणाजी शिंदे व सहा.पो.निरि. प्रतापसिंग बहुरे, पो.ऊपनिरि. रमेश वाघ, ASI राजेश निर्मल, हेड कॉन्स्टेबल भगवान बनसोडे, पवन सुलाने ई च्या वतीने करण्यात आली.