देशामध्ये हुकूमशाही चालविणाऱ्या केंद्र सरकारने खा. राहुल गांधी यांना विनाकारण डिवचण्याचे काम करू नये नसता जेलभरो आंदोलन – देशमुख

20

जालना | प्रतिनिधी – भाजपा आणि आरएसएस यांच्या हुकूमशाही वृत्तीमुळे देशातील लोकशाही धोक्यात आली असून त्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी आक्रमकपणे आंदोलन करत असल्यामुळे त्यांच्या विरूध्द कटकारस्थान रचण्याचे काम केंद्रातील सरकार करीत आहे. काँग्रेस पक्ष त्यांचे हे षडयंत्र हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. यापुढे राहूल गांधी यांनी विनाकारण डिवचण्याचे काम केल्यास काँग्रेस पक्ष जेलभरो आंदोलन करेल असा ईशारा जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिला आहे.
जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरूवार रोजी दुपारी जुना जालना गांधी चमन येथे केंद्र शासनाच्या हुकूमशाही आणि कुटील डावाच्या विरोधात जोरदार निदर्शने करून जेलभरो आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. काँग्रेस पक्षचे नेते खा. राहुल गांधी यांनी भाजपा आणि केंद्र शासनाच्या हुकूमशाही आणि कटकारस्थानाविरोधात देशामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मोहिम उघडल्याने खा. राहुल गांधी यांना खोट्यानाटया प्रकरणात अडकविण्याचा डाव उघड झाला आहे. यापुढे केंद्र सरकारने खा. राहुल गांधी यांच्या विरोधात कटकारस्थान केले तर जेलभरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेस जणांनी निदर्शने आंदोलन करतांना दिला.
याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस कल्याण दळे, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, जिल्हा सरचिटणीस राम सावंत, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सौ. नंदाताई पवार यांनी आपल्या भाषणातून केंद्र शासनाचा कुटील डाव आणि हुकूमशाही प्रवृत्ती बाबत आपले विचार व्यक्त करून निषेध व्यक्त केला.
खा. राहुल गांधी हे भारतीय राज्य घटना आणि लोकशाही कायम टिकविण्यासाठी देशभर भाजप आणि आरएसएसच्या विरोधात आंदोलन उभे करून लोकांना जागृत करण्याचे काम करीत आहे. आणि त्यांना देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत असल्यामुळे भाजपाचे धाबे दणानले आहे. केंद्र सरकार खा. राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधून त्यांना अडचणीत आणण्याचे काम करीत आहे. ही देशासाठी दुर्दैवी बाब आहे. यावेळी आंदोलन कर्त्यांनी केंद्र सरकार आणि मोदींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि राहुलजी के सन्मान मे काँग्रेस मैदान मे अशा घोषणा देत जोरदार निदर्शने केले.
याप्रसंगी जालना तालुकाध्यक्ष वसंत जाधव, त्रिंबक पाबळे, सुभाष मगरे, ॲड. राम कुऱ्हाडे, सुभाष कोळकर, आरेफ खान, शेख शकील, रमेश गौरक्षक, संजय भगत, राधाकिशन दाभाडे, किशोर गरदास, बालकृष्ण कोताकोंडा, चंद्रकांत रत्नपारखे, सय्यद करीम बिल्डर, सय्यद मुश्ताक, शेख शमशुद्दीन, नारायण वाढेकर, वैभव उगले, धर्मा खिल्लारे, शरद देशमुख, फकीरा वाघ, अ. बासेद कुरेशी, शेख वसीम, कृष्णा पडूळ, शहराध्यक्षा शितलताई तनपुरे, सुषमाताई पायगव्हाणे, मंगलताई खांडेभराड, मंदा पवार, मथुराबाई सोळुके, मंजु यादव, गणेश खरात, शिवाजी गायकवाड, गणेश चांदोडे, शिवप्रसाद चितळकर, योगेश पाटील गणेश वाघमारे, गुलाबखान पठाण, किशोर कदम, हरीष आनंद, जावेद अली, प्रमोद अल्हाट, भागवत घाटे, शेख अनस आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.