जालना | प्रतिनिधी- आपल्या समाजात मधुमेह हा एक सामान्य आजार झाला आहे. आपल्या देशात 77 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत त्यापैकी 12.1% रुग्ण हे 65 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. 11 पैकी एकाला मधुमेह आहे. आपल्या भारतात 2020 मध्ये 07 लाख लोकांचा मधुमेहामुळे मृत्यू झाला. जर आपण हा आजार समजून घेतला आणि त्याच्या उपचारांकडे लक्ष दिले तर आपण या आजाराशी सहज लढू शकतो. असे मत निरामय हॉस्पिटलचे संचालक डॉ.पद्माकर सबनीस यांनी जमात-ए-इस्लामी हिंद जलाना तर्फे आयोजित वैद्यकीय मार्गदर्शन शिबिरात व्यक्त केले.
डॉ.पद्माकर सबनीस यांनी रमजानचे उपवास रोजे व मधुमेहनी ग्रस्त रोगीया चे मार्गदर्शन करताना प्रेझेंटेशन देताना सांगितले की, मधुमेहाबाबत समाजात अनेक गैरसमज असून ते समजून घेऊन ते दूर करणे आवश्यक आहे. डॉ.सबनीस यांनी मधुमेही रूग्णांचे वर्गीकरण करून कोणत्या स्तरातील लोकांनी उपवास करावा आणि कोणत्या स्तरावरील लोकांनी उपवास करू नये हे सांगितले.कुराणच्या आयतींचा हवाला देत ते म्हणाले की, इस्लामने रुग्णांने रोगी व प्रवाशांना उपवास न ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जेव्हा ते बरे झाले तेव्हा त्यांनी आपले रोजे पूर्ण करण्यास सांगितले आहे. शेवटी डॉ. सबनीस यांनी सांगितले की ज्यांना मधुमेह आहे आणि त्यांना उपवास करायचा आहे त्यांनी मला भेटावे, मी त्यांना मोफत मार्गदर्शन करण्यास तयार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात गाझी तारिक नदवी यांच्या पवित्र कुराणच्या पठणाने झाली. स्थानिक अध्यक्ष शेख इस्माईल यांनी प्रस्ताविक करताना म्हटले की लवकरच आम्ही रमजान महिन्यात प्रवेश करणार आहोत. आजच्या कार्यक्रमात मधुमेह असूनही निरोगी कसे राहावे या साठी हा छोटासा कार्य्रमा ठेवण्यात आला आहे. सय्यद शाकीर यांनी सूत्रसंचालन केले. अब्दुल मुजीब, सचिव, न्याय विभाग, महाराष्ट्र, अब्दुल मुकित सर, इर्शाद कादरी सर इलियास खान सर अब्दुल हमीद विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास मोठ्या संख्येने स्त्री-पुरुष सहभागी झाले होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख इम्रान मणियार पॅथॉलॉजिस्ट, गणेश लुलेवार, देवा ढाकणे, शेख अब्बास, शेख वकार व सोहेल शेख शेख असद अब्दुल करीम यांनी सहकार्य केले. शेख इस्माईल यांनी आभार मानले.