जालना | प्रतिनिधी – जालना जिल्ह्यात भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) पक्षात प्रवेश करणार्या संख्या वाढली असून बीआरएस पक्षाचे जालना जिल्हाप्रमुख प्रविण फुके-पाटील यांच्या उपस्थितीत जालन्यात असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. दरम्यान २६ मार्च रोजी नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे होणार्या मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या
सभेस उपस्थित रहावे, असे आवाहन प्रविण पाटील फुके यांनी केले.
जालना येथे झालेल्या शासकीय विश्रामगृहातील बैठकीस मराठवाडा समन्वयक सोमनाथ थोरात, जालना जिल्हाप्रमुख प्रवीण पाटील फुके, अशोक अंभोरे, प्रल्हाद सोळुंके यांच्यासह पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना जिल्हाप्रमुख प्रविण फुके म्हणाले की, बीआरएस पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या अबकी बार किसान सरकार अशी घोषणा महाराष्ट्रामध्ये नादेड येथे झालेल्या जाहिर सभेमध्ये त्यांनी घोषणा दिली. त्या घोषणेला अनुसरुन महाराष्ट्रातील युवक,कामगार, शेतकरी, मजुर, महिला, जेष्ठ नागरिक, कष्टकरी समाज यांना एक आशेचा किरण हा के. चंद्रशेरराव यांच्यामध्ये दिसत आहे. नवीन अस्तित्वात आलेले राज्य तेलंगाणा या राज्यामध्ये ज्या सुख सुविधा त्यांनी काही वर्षात दिल्या. सर्व युवक कामगार, शेतकरी, मजुर,महिला, जेष्ठ नागरिक, कष्टकरी समाज, विद्यार्थी यांनाही वाटते की, आपल्या महाराष्ट्रामध्येसुध्दा या सुख सुविधा भेटल्या पाहिजे, शेतमालाला भाव भेटला पाहिजे, शेतीला लाईट व पाणी उपलब्ध झाले पाहिजे. यासाठी आज महाराष्ट्रातील तरुण हा भारत राष्ट्र समिती पक्षासोबत जोडला जात आहे. भविष्यामध्ये हा पक्ष सर्व निवडणुका लढविणार आहे. बीआरएस सर्व जागा लढणार
नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा, सर्व जागावर निवडणुक लढविणार आहे. त्याचप्रमाणे राजकारणामध्ये महिलांनही राजकारणामध्ये पक्षात मान सन्मान तसेच काम करण्याची संधी ही दिली जाणार आहे. असे भारत राष्ट्र समिती पक्षाचे मराठवाडा समन्वयक सोमनाथ थोरात यांनी सांगितले. यावेळी सतिश ढवळे, कविता पाष्टे आदींची उपस्थिती होती.