जालना । प्रतिनिधी – डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सन 2023 निमित्त मान्यवरांचा सत्कार ‘पौर्णिमा बौद्ध धम्म महिला महासंघ, आनंदनगर (चॅरिटेबल ट्रस्ट)’ यांच्या वतीने नागवंश सभागृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष निखिल पगारे, प्रमुख पाहुणे तथा सत्कारमुर्ती आयु.सुदामरावजी सदाशिवे, अध्यक्ष सर्वधर्म सामुहिक विवाह समिती – 2023 होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला सन 2023 चे सचिव आयु.राजेश ओंकार राऊत, अध्यक्ष आयु.दिपकजी धामणे होते. तसेच आंबेडकरी विचारांची समाजामध्ये पेरणी करणारे धम्म कार्यात अग्रेसर असणारे व्यक्तीमहत्त्व चळवळीचे अभ्यासु संविधान जनजागृती संघाचे मार्गदर्शक आयु.प्रकाशजी गडवे साहेब (क्षेत्र विकास अधिकारी भारतीय जीवन विमा निगम), आयु.दादारावजी हिवराळे (सेवानिवृत्त पोलीस गुप्तवार्ता अधिकारी, जालना) या दोघांना ‘महाबोधी बहुउद्देशीय संस्था, अमरावती तथा सुभेदार रामजी स्मृतीदिन आयोजित धम्म परिषद – 2023 ला ‘धम्मभूषण’ पुरस्कारांनी गौरवित करण्यात आले होते. भन्ते प्रा.सुमेध बोधी महास्थवीर अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मभुमि स्मारक महू (मध्यप्रदेश) महाबोधी सोसायटी श्रीलंकाचे धम्मदूत भारतीय भिक्खु संघ बुद्ध गया (भारत) संस्थेचे सचिव सम्राट अशोका अनाथ बालक गृहाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार बहाल केलेले ज्यांच्या बुद्ध विहारात आज तथागत भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी दर्शनासाठी ठेवणारे भन्ते प्रा.सुमेध बोधी महास्थवीर यांच्या हस्ते ‘धम्मभूषण’ पुरस्कार आयु.प्रकाशजी गडवे व आयु.डी.आर.हिवराळे साहेब यांना सन्मानपुर्वक बहाल करण्यात आले. या सर्व कार्यक्रमाचे संयोजक तथा आयोजक आयु.सदानंद टवले यांनी ‘बुद्धदर्शन पर्यटन’ सहलीचे आयोजन करून सहलीला आलेले सर्वांचा
स्वागत समारंभ व सत्कार करण्यात आला. सर्वधम्म सामुहिक सोहळ्यात 2023 चे अध्यक्ष आयु.सुदामराव सदाशिवे यांनी सत्काराला उत्तर देतांना जात निमुर्लनात डॉ.बाबासाहेबांची समग्र भुमिका व योगदान यासाठी आपले योगदान या विषयावर आपले विचार व्यक्त केले व सामुहिक विवाहचे महत्त्व पटवून दिले. पौर्णिमा बौद्ध धम्म महासंघ यांच्या वतीने
सामुहिक सोहळ्यात तीन नवदाम्पत्यांची नावे देण्यात आली. उल्लेखनीय कार्याबद्दल टाळ्यांच्या गजरात सत्कार करण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला – 2023 चे सचिव राजेश ओ.राऊत यांनी सत्काराला उत्तर
देतांना आंबेडकरी विचारधारा रूजविण्यासाठी योजनांची आखणी कशी केली त्यांनी आपले मत स्पष्ट केले. जनतेच्या वतीने ठराव मांडण्याची घोषणा केली. परिसरातील ज्येष्ठ नागरिक, पुरूष, महिला मंडळी, बाल-बालिका मोठ्या
संख्येने उपस्थित होते. आयु.कृष्णाराव ढगे साहेब (सेवानिवृत्त – विक्री कर अधिकारी) यांनी धम्म जागृती करून आंबेडकर वाद रूजविण्याचे कार्यावर मार्गदर्शन केले.
उपस्थितांमध्ये सोनाजी नावकर, हिम्मतराव म्हस्के, भुजंगराव भिसे, भिमराव पैठणे, केशव पगारे, मिलिंद धनेधर, कृष्णराव ढगे, सुभाष पोगरे, भास्कर घेवंदे, संजय वेव्हल, माधुरी वेव्हल, कदम मॅडम, वंसत पडघन, रघुनाथ मोरे,
शोभा मोरे, सुलोचना नावकर, द्वारका पडघन, मंगलताई म्हस्के, विशाखा टवले, वंदना घेवंदे, सुधाकर वाहुळकर, पंचशिला वाहुळकर, बापुराव उघडे, शंकुतला उघडे, शिवाजी वाघोसे, प्रेमा वाघोसे, उन्मेश सिरसाठ, दिव्या सिरसाठ, संजय हेरकर, अनुराधा हेरकर, भाग्यश्री पगारे, कमलताई पारधे, सरस्वती मगरे, पंचफुला साळवे, सुभाष लिहिणार, भिमराव पैठणे, विजय पैठणे, नारायण निकम, बिर्हाडे साहेब, गवई आर.एल., सुरेश सुखदाने हजर होते. भास्कर घेवंदे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.