जालना । प्रतिनिधी – वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात सर्दी,ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत.सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात 105 रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.जिल्ह्यातील सर्वच भागात सध्या सर्दी, ताप आणि खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मोठ्या व्यक्तींची संख्या जरी जास्त असली तरी लहान मुलांमध्ये देखील या आजाराचं प्रमाण वाढलं आहे. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात 30 लहान मुलांवर उपचार सुरु आहे.
याविषयी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी वायरल विषयी माहिती दिली.
सर्दी, खोकला, पडसं, डोकेदुखी, घशामध्ये खवखवणे तसेच ताप येणे आशी लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता डाक्टरांना दाखवणे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार उपचार करून घ्यावे. वरील लक्षणे आढळून आल्यास घरी असल्यास स्वतःला आयसुलेट करून घ्यावे किंवा कामावर असल्यास कामाच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. तसेच घरामध्ये एखाद्या व्यक्तीला असे लक्षण आढळून आले आणि त्यांना हायपरटेंशन, किंवा किडनीचे आजार तसेच ह्रदयाचे अजार असलेले पेशंट असतील तर आशा पेशंट पासून आंतर ठेवावे.
त्याच प्रमाणे स्वतःची काळजी घेण्यासाठी पाणी भरपूर प्यावे,संत्री,मोसंबी,हिरव्या पालेभाज्या आशाप्रकारचे अन्न घ्यावे,मास्कचा वापर करावे,कोमट पाण्यात मिठाच्या गुळणा कराव्या,गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे,वारंवार हात धुणे ई. बाबींची काळजी घ्यावे.
अशा प्रकारे स्वतःची व ईतरांची काळजी घेण्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डा. अर्चना भोसले यांनी जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन केले आहे.