अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या रिक्षाचालकास पोलिसांनी घेतले ताब्यात

177

जालना- मंठा नाका परिसारतील म्हाडा कॉलनीत येऊन अल्पवयीन मुलींची छेड रिक्षा चालकास सदर बाजार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सय्यद आसेफ सय्यद मोईन (रा. अमरछाया टॉकीज जवळ, ह.मु. नॅशनल नगर) असे त्याचे नाव आहे. याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत रितेशसिंग ठाकुर यांनी म्हटले आहे की, मुली घरासमोर बॅटमिंटन खेळत होत्या.यावेळी रिक्षावाला तेथे आला व त्याने मुलीचा वाईट हेतुने हात पकडुन रिक्षामध्ये बसण्यास बळजबरी केली व निघून गेला. दरम्यान, त्यांनी सांगितलेल्या रिक्षा क्रमांक MH20BT5198 आम्ही शोध घेतला असता तो रिक्षा चालक बुऱ्हाननगर रोडवरील डॉ. संदीप अग्रवाल यांच्या हॉस्पिटल समोर त्याची रिक्षा घेवुन थांबला होता. तेव्हा आम्ही त्यास नागरिकांच्या मदतीने पकडले. दरम्यान, सदर बाजार पोलिसांनी त्यास रिक्ष्यासह ताब्यात घेतले. त्या रिक्षाचालका विरुध्द सदर बजार पोलीस ठाण्यात 354 A- 8, 12, कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर बजार पोलीस अधिक तपास करीत आहेत.