जालना । प्रतिनिधी – जालना येथून बीड कडे जाणार्या चक20 इङ 2299 या बसला अंबड कडून येणार्या अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्यामुळे बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये पलटी झाली. या अपघातामुळे बस मधील जवळपास 30 ते 35 प्रवाशी जखमी झाले. या प्रवाशांना प्राथमिक उपचारासाठी शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, कर्मचार्यांचा जुनी पेन्शन योजनेसाठी संप सुरू आहे. असे असले तरी आरोग्य कर्मचार्यांनी माणुसकीचे दर्शन घडवीत माहिती मिळताच रुग्णालयात धाव घेत जखमींवर उपचार सुरू केला आहे.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिक मदतीसाठी सरसावले. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. अपघातग्रस्त बसमध्ये 55 ते 60 प्रवाशी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
शासकीय सामान्य रुग्णालयात जखमींना दाखल केल्यानंतर जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अर्चना भोसले यांनी तात्काळ उपचार करण्यासाठी आरोग्य अधिकारी व कर्मचार्यांना सूचना केल्या. कर्मचार्यांचा संप सुरू असला तरी माणुसकीचे दर्शन घडवित आरोग्य कर्मचार्यांकडून जखमींवर उपचार सुरू आहेत.