टेंभुर्णी । प्रतिनिधी – तालुक्यातील बावणे पांगरी ते आसरखेडा या रस्त्याची अक्षरशा मोठी दुर्दशा झाली असून सहा ते सात किलोमीटर अंतरावर असलेल्या रस्त्याच्या बाजूला खडी उकळून पडल्याने व रस्त्यावर मोठ मोठे पडलेले असून त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत असून त्यामुळे तातडीने बदनापूर सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन सात किलोमीटर अंतरावरील खडीकरण करून डांबरीकरण करण्यात यावे अशी वारंवार नागरिकांतून मागणी होऊनी सुद्धा काम करण्यात आले नसून शासन दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो रुपयांची दुरुस्ती करण्याकरिता लाखोचा रुपयांची निधी मंजूर देत असून तरीसुद्धा ग्रामीण भागातील रस्त्यांचे डांबरीकरण व खडीकरणासन जागोजागी पुल दुरुस्ती असं असलेले कामाचे नियोजन करून निधी उपलब्ध करत आहे तरी ग्रामीण भागातील रस्त्यांची व पुलांची नळखंडा, असे अनेक काम दुरुस्ती होत नसल्याचे सांगितले जाते त्यामुळे तातडीने ग्रामीण भागातील खडीकरण डांबरीकरण पूल बांधणी असे काम करणे गरजेचे असून त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही याकडे लोकप्रतिनिधी व जालना जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन तातडीने ग्रामीण भागातील रस्त्यांचे डागडुगी व दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे डोणगाव पोखरी बुटखेडा देळेगव्हाण गाडेगव्हाण सातेफळ शिराळा इस्लाम वाडी आसरखेडा निवडुंगा आधी गावाचे दळणवळण असून काम तातडीने सुरू करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.