शेतकर्‍यांच्या आत्महत्त्या होत असतांना कृषिमंत्री बेफिकीर – माजी खा. शेट्टी

24

परतूर । प्रतिनिधी – अवकाळी परतीच्या पावसाने पिकांची शेतं मालाची राखरांगोळी झाली. शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. सरकार यांची दखल घेत नाही. शेतकर्यांना सहन होत नाही. असहय होत असल्याने शेतकरी आत्महत्या करतो. कापसाला भाव नाही. कापूस आयात होणारे शुल्क कमी केल्याने सुतगिरणी कापूस आयातिचे सरकार धोरण ठरवत असतांना शेतकरी महत्वाचे की सुटगिरण्या हे कळत नाही. शेतकर्या बाबतीत कृषि मंत्री बेफिकीर असल्याचा आरोप माजी खा राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
खत खरेदी करतांना शेतकर्यांना जात सांगणे बंधनकारक केल्याने सरकार हे जाती धर्मात तेढ निर्माण करून शेतकर्यांची जात विचारली आहे. शेतकर्यांची जात विचारून खतावर आरक्षण देणार आहे का ? शेतकर्यांची जात विचारू बेइज्जत केल जात असल्याचे शेट्टी म्हणाले. शेतमालाला हमी भावासाठी एमएसपी कायदा लागू केल्यास व्यापारी, कंपन्या व सरकारला हमी भावात माल खरेदी करणे बंधनकारक राहील. हरभरा हमी भाव खरेदी केला जातो मात्र याचा चार टक्के शेतकर्यांना फायदा होतो. 96 टक्के शेतकरी वंचित राहतात. आणि त्यात अत्यअल्प भूधारक 85 टक्के शेतकरी आहे. यासाठी एमएसपी कायदा हवा.
केवळ ओबीसी राजकीय आरक्षण मिळू नये म्हणून कायद्याच्या कचाट्यात घेऊन निवडणुका लांबांनीवर पडल्या आहेत. सरकार हे जाणीव पूर्वक करून अडवणूक करीत असल्याचा आरोप यावेळी माजी खा. राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषेदेत केला आहे.सरकार हे जनतेच्या जीएसटी करावर चालते.एक महिन्याचा एक कोटी 71 लाख रुपये महिन्याचा जीएसटी जमा झाला आहे. सरकारला सर्वाधिक दारुवर टँक्स लावत आहे. हे सरकार दारुडयाच्या पैशावर चालते.असे म्हणे तरी वावगे ठरनार नाही. कोविड नंतर सरकारने आगोदर दारुची दुकान उघडण्याचा निर्णय घेतला. असल्याचे माजी खा राजू शेट्टी म्हणाले. शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होतांना दिसत आहे.यावेळी या कार्यक्रमाला मराठवाडा माजी अध्यक्ष प्रा.डॉ. प्रकाश पोपळे,जिल्हाध्यक्ष सुरेश काळे,सुरेश गवळी, हभप शिवाजी महाराज भोसले, किशोर ढगे, साईनाथ चिन्नदोरे,अरुण अंभोरे, तालुकाध्यक्ष गणेश राजबिंडे, नामदेव खोसे,भारत सुरुंग, मधुकर राजबिंडे, तात्याराव गोरे, वैजनाथ दराडे, बाळासाहेब बिडवे, यांच्या सह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.पांडुरंग नवल यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष गणेश राजबिंडे यांनी मानले.