भगवान धनगे यांना आदर्श पुरस्कार

13

टेंभुर्णी – श्रीरामपूर येथे आज शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने लुम्बिनी बौद्ध विहार श्रीरामपूर या सभागृहात पार पडलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात दिल्या जाणार्‍या विविध क्षेत्रात विविध पद्धतीने उत्कृष्ट काम करणार्‍या उत्कृष्ट पत्रकार क्षेत्रामध्ये,सामाजिकक्षेत्रात, शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले श्री भगवान आसाराम धनगे यांना शिव स्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दिला जाणारा ’आदर्श पुरस्कार’ कार्यक्रमाचे अध्यक्ष मा कॉ. बाबा आरगडे (सल्लागार समिती महाराष्ट्र राज्य),डॉ.अशोकराव ढगे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला आहे.10 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता श्रीरामपूर, (अहमदनगर) येथे विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. शिव स्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचे राज्य अध्यक्ष श्री संजयजी वाघमारे राज्य उपाध्यक्ष श्री बाळासाहेब सिरसाठ राज्य सचिव सौ. ताई वाघमारे यांच्यासह भाऊ बागुल (ग्रामीण साहित्यिक श्रीरामपूर), डॉ. वंदनाताई मुरकुटे (साहित्यिक), ह.भ.प. दत्तात्रय महाराज बहिरट, चंद्रकांत वाकचौरे, सुभाष गायकवाड, यांच्या प्रमुख उपस्थितत व राजेंद्र देवकर (जिल्हाअध्यक्ष शिवसेना), भीम बागुल (विभागीय जिल्हा अध्यक्ष आर. पी. आय), साहेबराव पवार, सुनिल शिरसाठ (लोकनियुक्त सरपंच टिळकनगर), साहेबराव पवार (प्रगतशील शेतकरी), संतोष भाऊ भोकाळ, सुनिल शिंगारे, विलास जाधव, संजय रुपटक्के, त्रिंबकराव भदगले, शिवाजी गांगुर्डे, संदीप वाघमारे (उपाध्यक्ष भारतीय जनता पाटी), दिपक आगळे (एनजीओ संस्थापक अध्यक्ष), सुभाष त्रिभुवन, सुगंदराव इंगळे, कविवर्य अशोक बागुल, बाबासाहेब पवार, कवी व गीतकार वाडाळा महादेव संदीप कदम, कवी श्रीरामपूर इ.मान्यवरांच्या उपस्थितीत हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. भगवान धनगे यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे गावभर तसेच मित्रपरिवरामधून स्वागत करण्यात येत आहे.