परतूर । प्रतिनिधी – परतुर तालुक्यात उन्हाळ्याची चाहूल लागताच अवैध वृक्षतोडी चा सपाटा सुरू झाला आहे. दाट झाडी असलेल्या ठिकाणी वाळवंट होण्याच्या मार्गावर विशाल वृक्षावर लाकूडतस्कारांची वक्रदृष्टी पडली असून अवैध्य वृक्षतोडीने कळस गाठला आहे. या आवेद्य वृक्षतोडीवर कारवाई करण्याऐवजी वन विभागाचे अधिकारी वसुली करण्यापूरते असल्याने दाट वृक्ष असलेल्या परिसरात उजाड वाळवंट होण्याचा धोका दिसून येत आहे. आर्थिक परिस्थिती मुळे अडचणीत सापडलेल्या शेतकर्यांना परिस्थितीचा लाभ उचलण्यासाठी लाकूड तस्करी करण्याच्या टोळ्या सध्या सक्रिय झालेल्या आहेत . शेतकर्यांच्या विशाल वटवृक्ष खरेदी करण्यासाठी संबंधित शेतकर्यांना भुलथापा देत आहेत त्यांच्या भूलथापांना बळी पडून आर्थिक विवंचनेत असलेले काही शेतकरी शेतातील झाडे कवडीमोल भावात विकत आहेत. एकदा हा व्यवहार ठरला की काही विलंब न लावता तस्कराकडून खरेदी केलेल्या झाडाची तोड करून लाकूड तस्करीच्या आरा मशीन पर्यंत पोहोचवले जात आहे वास्तविक पाहता कर विभागाच्या परवानगीशिवाय कुठलीही झाडाची तोड करणे बेकायदेशीर असले तरी अवैध्य वृक्षतोड विरुद्ध वन विभागाकडून केली जाणारी कारवाई ही हप्ते वसुली पुरतीच होत असल्याने वृक्ष तोडीच्या बाबतीत परतुर तालुक्यात वनाधिकारी व लाकूडतस्कर यांची मिली भगत असल्याचे दिसून येत आहे. वृक्षतोडीच्या गोरख धंद्यात काही आरामशी न व वन विभागाचे हस्तक सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांचा हा लाकूड व्यवसाय भरमसाठ प्रमाणात दिसून येत आहे. परतुर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाले आहेत त्यामध्ये लिंबाची झाडे ,वडाची झाडे ,बाभळीची झाडे, वृक्ष मोठ्या प्रमाणावर ती आहेत याची दिवसाढवळ्या कत्तल करण्याचे काम सध्या चालू आहे. यामुळे मौल्यवान झाडे नामशेष होत आहेत. लाकूडतोड तस्करांनी विशाल मोर्चा वृक्षतोडीकडे वळवलेला आहे अनेक शेतकर्यांच्या शेतातील आंबा ,चिंच,वड इत्यादी मोठ्या वृक्षांची तोड वन विभागाच्या विनापरवानगी विना कवडी मोल भावात खरिदी करून तोडली जात आहे . वन विभागाच्या अर्थपूर्ण आशीर्वादाने शेकडो झाडांची कत्तल करू लागले आहे. वेळीच आवर घालून कठोर कारवाई केली गेली नाही तर , या वनविभागाचे वाळवंट आल्यास वेळ लागणार नाही अशी प्रतिक्रिया वृक्षप्रेमी नागरिकांमधून होत आहे.