जालना । प्रतिनिधी – संस्कार विद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने विद्यार्थिनींचे पुष्पृष्टीने स्वागत करण्यात आले.यावेळी शाळेतील शिक्षिका श्रीमती रेखा हिवाळे, कीर्ती कागबट्टे, शारदा उगले दहिभाते, स्वप्नज्या खोत, अश्विनी बोंदरवाल आदि शिक्षिकांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थिनी जान्हवी वाघ या विद्यार्थिनीने महिला दिनानिमित्त यशस्वी महिला आणि महिलांचे महत्त्व विशद केलं.या कार्यक्रमाचे आयोजन उपक्रमशील शिक्षक रामदास कुलकर्णी यांनी केले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी शिंदे हिने तर आभार प्रदर्शन किरण धुळे यांनी मानले.यावेळी शाळेतील शिक्षक किरण धुळे रशीद तडवी आणि विद्यार्थी आदींची मोठ्या संख्येने उपस्थित होती.