केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात काँग्रेस पक्षाचे बँकेसमोर निदर्शने

13

जालना । प्रतिनिधी – केंद्रातील मोदी सरकार उद्योगपती मित्र अडाणी समुहाला एलआयसी, एसबीआय बँक व सार्वजनिक संस्थेचा पैसा दिल्याचा महाघोटाळा समोर आला आहे. या प्रकरणी या महाघोटाळ्याविरोधात जालना शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने एसबीआय बँक (छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ) जालना येथे तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले.
जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्रातील मोदी सरकारचा निषेध नोंदवत अडाणी व मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. केंद्रातील मोदी सरकार देशातील सार्वजनिक संस्था विकण्याचा सपाटा लावीत असतांना आता मात्र एलआयसी सारख्या सर्वसामान्यांची आर्थिक रक्तवाहिनीवर डल्ला मारुन देशातील नागरीकांना देशोधडीला लावल्याचे काम करीत आहे. बँकेतील (जनतेचा पैसा) अडाणीला देऊन देशाच्या संस्था विकत घेण्यासाठी सरकार पैसा देत आहे. हा कुठला प्रकार आहे. असा जिल्हाध्यक्ष श्री देशमुख यांनी आपल्या भाषणातून विचारला. यावेळी जालना शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, प्रदेश सरचिटणीस प्रा. सत्संग मुंडे, प्रदेश प्रतिनिधी अण्णासाहेब खंदारे, जिल्हा ंयुवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल देशमुख, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नंदाताई पवार, यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकारचा व्यक्त करीत हा महाघोटाळा जनतेसमोर आणावा, अशी जोरदार मागणी केली. याप्रसंगी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वसंत जाधव, सुभाष कोळकर, अ‍ॅड. सय्यद मुसा, जगदीश भरतीया, डॉ. विशाल धानुरे, शेख शकील, शेख शमशूद्दीन, नारायण वाढेकर, आरेफ खान, विनोद यादव, सय्यद करीम बिल्डर, फकीरा वाघ, कलीम खान, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष अन्नदाते, मंजू यादव, मंदा पवार, शेख वसीम, शेख हमतीफ, गुलाब खान, किशोर कदम, सय्यद रहिम तांबोळी, गणेश खरात, माऊली डुकरे, शेख इरशाद, सोपान सपकाळ, किशन जेठे, रामजी शेजूळ, शब्बीर बिल्डर, विष्णू भालेराव, जावेद अली आदींची उपस्थिती होती.