परतूर । प्रतिनिधी – परतूर शहराला केंद्रस्थानी ठेवून माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पुन्हा एकदा भरपूर शहरातील रस्त्यांच्या बांधकामासाठी दहा कोटी रुपयांचा निधी खेचून आणला असून लवकरच या रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार असल्याचे प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे
पुढे या पत्रकात म्हटले आहे की, परतुर रेल्वे गेट समोरील रस्त्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनला होता मात्र पुलाच्या कामाव्यतिरिक्त उर्वरित रस्त्याचे काम होणे गरजेचे होते या अनुषंगाने माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मोंढा येथील पाण्याच्या टाकी पासून तर डॉक्टर कोटेच्या यांच्या किराणा दुकानापर्यंतचा रस्ता या रस्त्याच्या बांधकामासाठी 1 कोटी 50 लाख रुपयांचा, तर तनपुरे कॉर्नर बस स्टँड या रस्त्याच्या कामासाठी 1 कोटी 50 लाख रुपये, तर तहसील कॉर्नर ते महाविद्यालय या रस्त्याच्या कामासाठी 02 कोटी रुपयांचा निधी, प्राप्त झाला असून शहरातील अंतर्गत रस्त्यासाठी ही पाच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे त्यामुळे शहराचा विकासरथ अधिक वेगाने पुढे जाणार असून परतूर नगरपालिका हद्दीमध्ये माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांमध्ये 10 कोटी रुपयांची कामे झाली आहे, तर नव्याने मंजूर झालेल्या दहा कोटी निधी मध्ये परतुर शहरातील विविध भागातील रस्त्यांची समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे
दरम्यान शहरात मंजूर झालेल्या रस्त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नगरसेवक पदाधिकार्यां सह नागरिकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला असून खर्या अर्थाने माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून परतुर शहराचा विकास झाला असल्याची प्रतिक्रिया यावेळी बोलताना अनेकांनी व्यक्त केली. शहरातील नगरपालिका ताब्यात नसतानाही माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी गेल्या पाच सात वर्षापासून परतूर शहरांमध्ये अनेक विकास कामे खेचून आणत शहराच्या विकासात मोठी भर टाकली असल्याची प्रतिक्रिया यावेळी अनेक जण व्यक्त करताना दिसले.