जालना । प्रतिनिधी – अग्र- माधवी ग्रुप तर्फे फाल्गुन मासातील एकादशीला भिमाचा नातू बारबर ने दिलेले बलीदान आणि होळी सणाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या खाटू शाम बाबा की भजन संध्येत बाळकृष्ण, राधा-कृष्णांवर महिलांनी केलेली रंगी-बेरंगी फुलांची उधळण,सुप्रसिद्ध गायक सुदर्शन कुमार शर्मा यांनी सादर केलेल्या कृपा कर दे रे ओ सावरिया, अब के फागन मे,, शाम संग होली खेलू, ऐसा मन मे आवे रे अशा बहारदार गीतांवर भक्ती रसात जालनेकरांनी होळीचा जल्लोष पूर्ण आनंद लुटला.
वृंदावन लॉन्स येथे शनिवारी ( ता. 04) सायंकाळी आयोजित भजन संध्येस अग्र- माधवी ग्रुप च्या संस्थापिका सौ. संगीता गुप्ता, बनारसीदास जिंदल, सी. ए. गोपाल अग्रवाल, जयभगवान जिंदल, सुनील अग्रवाल, गोवर्धन अग्रवाल, मुकेश गुप्ता, सुनील मित्तल, राजेश कामड, किशोर देवीदान, नरेश गुप्ता, राजेश लाला, महेंद्र अग्रवाल, ड.सतीश तावरावाला ,रामेश्वर अग्रवाल ,रोहित अग्रवाल ,दीपक पंच, संजय पंच, यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी विधीवत पूजन,गणेश स्तवनानंतर सुप्रसिद्ध गायक सुदर्शन कुमार शर्मा यांनी मुरलीवाला दीनो का दयाल मेरा है, बोलो प्रेमिओ शाम बाबा की जय, खाटू बाबा की जय,,, कीर्तन की है रात,,, अशा भक्ती गीतांवर टाळ्यांच्या कडकडाटात नवचैतन्य निर्माण केले.
छोट्याशा परिवारात येण्यासाठी गीतांद्वारे भगवान श्री कृष्णाचे आवाहन, साक्षात हुबेहूब राधा- कृष्णांचे वाजत-गाजत व्यासपीठावर आगमन होताच रंग लेके खेलते,,, मेरा शाम बडा रंगीला है…, सुमधूर गीतांवर भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाट केला तर राधा- कृष्णांनी नृत्यावर उपस्थितांना ठेका धरण्यास भाग पाडून फुलांची उधळण करत डोळ्यांचे पारने फेडले. महिला, युवती, मलींनी तल्लीन होऊन फुगड्या, पाऊली व नृत्याचा मनसोक्त आनंद लुटला. फागन मे खाटू नहीं देखा तो क्या देखा,, शाम बाबा तेरे पास आ रहा हू,,, असे गीत सुरू असतांना विविध रंगाचे ध्वज हाती घेऊन , फुलांच्या पुष्पवृष्टीत बालकृष्णाचे आगमन झाले. गोपाल कृष्णाचे साज-श्रृंगार, नयनरम्य, मनमोहक रूपाचे वर्णन करणारी भक्ती गीते, महिलांनी काढलेली दृष्ट अशी साक्षात गोकुळातील आनंदाची अनुभूती आली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या भजन संध्येत भाविक तल्लीन झाले. आरती व शेवटी महाप्रसादाने समारोप झाला.सुञसंचालन वसुंधरा जिंदल व विजया अग्रवाल यांनी केले तर अध्यक्षा सौ. ललिता अग्रवाल
यांनी आभार मानले. या वेळी सल्लागार सौ. सोनल मित्तल, सचिव सौ. उमा पंच, उपाध्यक्षा सौ. संतोष भारूका, कोषाध्यक्षा चंदा अग्रवाल, शोभा देवीदान, चंचल बरांजलावाला, सावित्री मल्लावत, रेणू भारूका, सौरभ पंच यांच्या सह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.