जालना नगर पालिकेचा निष्काळजीपणा; मोती तलावातील मृत मासे टाकले होते उघड्यावर

29

जालना । प्रतिनिधी – मोती तलावातील हजारो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, पालिका प्रशासनाने तलावातील या मृत माशांचा खच गांधीनगर रेल्वे उड्डाण पुलाच्या खाली आणून टाकला होता. पालिका प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त केल्यानंतर पालिका प्रशासनाने तात्काळ हा मृत माशांचा खच उचलून नेला आहे.
मोती तलावातील हजारो माशांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार रोजी दुपारी उघडकीस आली. या माशांच्या मृत्यू मागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्रथमदर्शनी डॉक्टरांनी अज्ञात संसर्गजन्य रोगाने या माशांचा मृत्यू झाल्याचे शक्यता वर्तवली आहे. दरम्यान हे मृत मासे पालिका प्रशासनाने कोणत्याही शास्त्रीय पद्धतीचा अवलंब न करता रेल्वे उड्डाण पुलाच्या खाली आणून टाकल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त करण्यात करण्यात आला. पालिकेच्या या निष्काळजीपणाची चर्चा होताच. प्रशासनाने हा खच तेथून हलविला आहे.