परतूर । प्रतिनिधी – ग्रामीण भागातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मागील पंचवार्षिक मध्ये मंत्रीपदाच्या कार्यकाळात गाव वाडी वस्ती तांडा येथे डांबरीकरणाची पक्के रस्ते करण्याचा अविरत प्रयत्न आपण केला असून परतुर विधानसभा मतदारसंघात परतूर मंठा नेर सेवली या सर्व विभागात डांबरीकरणाचे पक्के रस्ते निर्माण केले आहेत ज्या रस्त्यांना क्रमांक नव्हता त्याची प्रक्रिया पूर्ण करून राहिलेले सर्व रस्ते पूर्ण करण्याचा आपला मनोदय आहे रस्ते हे विकासाच्या नाड्या असून रस्त्याशिवाय गाव वस्तीवाल्यांचा विकास होणे शक्य नाही असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज केले. मागील कार्यकाळात महाविकास आघाडीचे सरकार असताना च कामांना निधी मिळाला नाही परंतु मागील 8 महिन्यानंतर सत्तांतर झाले आणि केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करत मागील काळातील अनुशेष भरून काढण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे स्वतंत्र झाल्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 52 कोटी रुपयांचा निधी मतदार संघाच्या विकासासाठी डांबरीकरण रस्त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला. त्याच निधीमधून राज्यमार्ग 13 ते वायाळ पांगरी – माळकिनी रस्ता – प्रजिमा रस्ता 5.00 किमी ते 9.00 किमी रस्त्याची सुधारणा करणे या 02 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन आज आपण करतो आहोत असे प्रतिपादन माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी केले. आपण कधीही मतदारसंघात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दारू किंवा इतर व्यसनाधीन करणार्या बाबींना प्राधान्य दिले नाही परंतु संपूर्ण मतदारसंघाला फिल्टरचे शुद्ध पाणी पाजण्याचा संकल्प केला होता त्या संकल्पच्या माध्यमातून परतुर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावाला फिल्टरचे शुद्ध पाणी देत आहे. लवकरच मंठा तालुक्यातील 95 गावांना वॉटर ग्रीडचे शुद्ध पाणी प्यायला मिळेल असा विश्वास व्यक्त माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी व्यक्त केला तसेच पुढे बोलताना श्री लोणीकर म्हणाले की सर्वसामान्य जनतेला व्यसनाधीन करण्यापेक्षा फिल्टरचे शुद्ध पाणी देऊन त्यांचे आयुष्यमान वाढवण्याचा प्रयत्न करत जनतेच्या ऋणातून उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न आपण करत आहोत. गणेशराव खवणे, प्रल्हाद बोराडे, सतीश निर्वळ, पंजाबराव बोराडे, राजेश मोरे, नागेश घारे, कैलास बोराडे, प्रसादराव बोराडे, विठ्ठलराव काळे, उद्धवराव गोंडगे, प्रसादराव गडदे, नाथराव काकडे, भाजयुमो परतूर तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे, किशोर हनवते, सा बां विभागाचे उपअभियंता निवारे, अरुण मुसळे, आनंद जाधव, कैलास चव्हाण, विकास शिंदे, तानाजी शेंडगे, रामकिसन मुसळे, जानकीराम चव्हाण, जगन वरकड, कैलास खराबे, शरद पाटील, भगवान देशमुख, जगदीश जाधव, नारायण कणसे, विष्णुपंत कणसे, शामराव चव्हाण, रमेश जाधव, जनार्दन जाधव, अच्युतराव जाधव, आसाराम इंगळे, दिगंबर खिस्ते, मारुती गाडे, वसंतराव खिस्ते, विलास जाधव, गणेश जाधव, भारत जाधव, अंकुशराव खिस्ते, रामप्रसाद मिसाळ, अनंतराव खणके, विष्णुपंत खिस्ते, शाखा अभियंता शिंदे पोलीस निरीक्षक संजय देशमुख दिगंबरा आवचार भगवान लहाने नवनाथ चट्टे माऊली कोंडके सुधाकर सरकटे कृष्णा खंदारे रामप्रसाद गिराम यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त रेणुकादेवी मंदिर येथे महाआरती चारा वाटप यासह वारकरी शिक्षण संस्थेला मृदंगासह उपयोगी साहित्य वाटप
आपण जनसामान्यांच्या विकासासाठी कायम तत्पर असून आयुष्यभर जनसेवेचा वसा जपणार आहोत. मतदारसंघाच्या विकासासाठी कधीही राजकारण केले नाही. मतदारसंघातील जनतेच्या प्रेमाने भारावून गेलो, कायम जनतेच्या ऋणात राहील असे भावोद्गार माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी वाढदिवसानिमित्त ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था मंठा येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केल्या भावना केल्या. यावेळी शिक्षण संस्थेचे संचालक हभप रामेश्वर महाराज नालेगावकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी घडवण्याचं काम घडत आहे भावी पिढी संस्कार निर्माण व्हावी यासाठी वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भागवतकार रामायणाचार्य भागवताचार्य कीर्तनकार मंडळी तयार होतील व भावी पिढी घडवण्यासाठी नक्की प्रयत्न करतील भविष्यात या शिक्षण संस्थेची भरभराट व्हावी या शिक्षण संस्थेतून महाराष्ट्रातील विदेशी नामवंत कीर्तनकार उभे राहावे यासाठी शुभेच्छा देत या वारकरी शिक्षण संस्थेच्या भरभराटीसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी प्रामाणिकपणे करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन असा शब्द देखील यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी उपस्थित वारकरी बांधवांना दिला मंठा येथे माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते रेणुकादेवीची महाआरती करण्यात आली त्यानंतर गोशाळेमध्ये वाढदिवसानिमित्त दिनेश सराफ यांच्या वतीने चारा वाटप करण्यात आला. त्यानंतर ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था मंठा येथे गणेशराव खवणे, संदीपभैया गोरे, सतीशराव निर्वळ, राजेश मोरे, कैलास बोराडे, पंजाबराव बोराडे, विठ्ठलराव काळे, नागेशराव घारे, निवासराव देशमुख, प्रसादराव बोराडे, मुस्तफा पठाण यांच्या वतीने वारकरी विद्यार्थ्यांना वारकरी गणवेश टाळ मृदंग साऊंड सिस्टिम हार्मोनियम यासह शालेय साहित्य वाटप करण्यात आले.