जालना | प्रतिनिधी – मोठ्या अशाने व विश्वासाने नागरिकांनी तुमच्यावर सरपंच पदाची जबाबदारी टाकली आहे. या जबाबदारीचा व अधिकाराचा वापर गावाच्या कल्याणासाठी करावा असा सूर नव्याने निवडून आलेल्या सरपंच यांच्या प्रशिक्षणातून निघाला आहे.
राज्य शासनाच्या ग्राम विकास व यशदा या संस्थेच्या माध्यमातून नव्याने निवडून आलेल्या जालना, परभणी व नांदेड जिल्ह्यातील सरपंचाचे चार दिवसीय प्रसिद्ध निवासी प्रशिक्षण खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्र येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन सोमवार दि. 27 फेब्रुवारी करण्यात आले. या शिबिराच्या पहिल्या सत्रात सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी बेले सेवानिवृत्त गटविकास अधिकारी गुंजकर यांनी सरपंच यांना आपल्या हक्क व अधिकाराची जाणीव करून देत गावाच्या विकासासाठी सर्व सरपंच यांनी मेहनत व परिश्रम घ्यावे जेणेकरून गावाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. सर्वप्रथम शिबिरासाठी उपस्थित असलेल्या असलेल्या सर्व सरपंच यांनी आपला परिचय करून दिला. आगामी तीन दिवशीय प्रशिक्षन शिबिरात राज्यभरातील नामवंत मान्यवर मार्गदर्शन मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराच्या माध्यमातून सरपंच यांनी गाव विकासाची शिदोरी आपल्यासोबत घेऊन जावी असे आवाहन मार्गदर्शक बेले व गुंजकर यांनी केले आहे. या प्रशिक्षण शिबिरामध्ये उत्तम व्यवस्था आयोजकाच्या वतीने करण्यात आल्याने सरपंच यांनी समाधान व्यक्त केले.