जालना । प्रतिनिधी -जेसीबी चोरी करणाऱ्या ०४ अज्ञात चोरांना १२ तासात ताब्यात घेवून चोरी झालेली जेसीबी व चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन कार असा रु.४६ लाखाचा मुददेमाल केला जप्त, सदर बाजार डी. बी. पथकाची कारवाई दि.२६ फेब्रू. रोजी कन्हैय्यानगर, जालना येथून रस्त्याच्या बांधकामाच्या ठिकाणाहून जे.सी.बी. चोरी झाल्याची घटना घडली होती.संदीप किसनराव नाईकवाडे रा. गोपीकिशन नगर, जालना यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करुन गुन्हयाचा तपास पोउपनि राजेद्र वाघ यांच्याकडे देण्यात आला होता.
दिनांक २६ फेब्रू.रोजी गुन्हयाच्या तपासादरम्यान आरोपींचा शोध घेत असतांना चिखली, जि. बुलढाणा येथून आरोपी शेख मोहम्मद शेख बशार, वय ३० वर्ष, रा.मु.पो. एकलारा, ता. चिखली जि.बुलढाणा यास ताब्यात घेतले व त्याकडे पोलीसांनी चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार आरोपी सागर हरिश्चंद्र बांजाळ, वय-२९ वर्ष, रा.मु.पो. बोरगाव काकडे, ता. चिखलो जि. बुलढाणा, दिपक मुरलीधर मांजरे, वय-२३ वर्ष, रा.मु.पो. बोरगाव काकडे, ता. चिखली जि. बुलढाणा, नारायण अशोक दळवी, वय २४ वर्ष, रा. एकलारा, ता. चिखली जि.बुलढाणा यांचेसह गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेतले व गुन्हयात चोरी गेलेलो जे.सी.बी. व. चोरी करण्यासाठी वापरत असलेल्या फोर्ड इकोस्पोर्ट, मारुती अल्टो कार असा एकुण रु. ४६ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर, पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, डी. बी. पथकाचे पोलीस उप निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सुभाष पवार, धनाजी कावळे, इरशाद पटेल, जगन्नाथ जाधव, सोमनाथ उबाळे, मनोहर भूतेकर, सागर बाविस्कर यांनी केली आहे.