हिंदू रक्षणासोबतच शेतकरी देखील जगला पाहिजे – डॉ तोगडिया

16

टेंभुर्णी । प्रतिनिधी – जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील दत्तनगर भागात मंदिरा समोरील प्रांगणात डॉ. प्रवीणजी तोगडिया यांच्या विशाल हिंदुराष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत जातीभेद न करता सर्व धर्मातील जनतेला सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले, त्याप्रमाणे आज हा देश चालवा यासाठी आमचा लढा चालू आहे.औरंगाबाद व उस्मानाबाद शहराचे नामकरण करुन संभाजीनगर व धाराशिव केल्याबद्दल या निर्णयाचे स्वागत करत, देशातील रोजगार,शिक्षण, कर्जमुक्त शेतकरी, वाढती महागाई सारख्या इत्यादी मुद्द्यावर त्यांनी सत्ताधार्‍यावंर सडकून टीका देखील केली. देशात शेतकर्‍यासाठी ाीि सारखा कायदा बनत नाही, तोपर्यंत राष्ट्रीय बजरंग दल आमचा लढा सुरूच रहणार असल्याचे सांगितले.राज्यात शिंदे व फडविणविस सरकार हिंदुवादी असल्याचा दींडोरा पिट्वात असताना, आमच्यासह सभेला आलेले देखील हिंदूच आहेत,अशी बोचरी टीका केली.तर राममंदिर उभारणी कुठल्याही एका व्यक्तीचे मर्जीने होत नाही.राममंदिरचा प्रश्न मार्गी लागला,उभारणीचे काम जोरात सुरू आहे.त्याचे स्वागत करतो.परंतु हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी स्वर्गीय पंतप्रधान अटलजी, बाळासाहेब ठाकरे, अडवाणीजी, राष्ट्रीय बजरंग दल सह असंख्य कारसेवक यांचे खूप मोठे योगदान आहे. हे देखील विसरून चालणार नाही, असेही ठणकावून सांगितले. लोखसंख्या सध्याच्या काळात सर्वात मोठी भेडसावणारी समस्या म्हणजे आहे.तिला नियंत्रणात आणण्यासाठी कायदा करण्याची गरज असल्याचे सांगितले.
सभेला प्रमुख पाहुणे डॉ. प्रवीणजी तोगडिया तर प्रमुख उपस्थितांमध्ये मा.हेमंत त्रिवेदी,मा.किशोरजी दिकोंडवार, मा.जगन्नाथ जाधव, मा.सुभाषभाई मोकारिया,मा.प्रकाशजी लाखरा, किरण सुरे मा.राजू उबाळे,मा.सुरेश मोरे,सह आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश देशमाने यांनी केले तर गजानन गोफणे आभार यांनी मानले. या कार्यक्रमासाठी अविनाश देशमाने, पंकज काबरा, विनोद इंगळे, राजु केवट, शैलेश दोमाळे, भरत बोराडे, राहुल देशमुख, योगेश पेटोळे, आकाश जाधव, सह असंख्य स्वयम् सेवक यांनी परिश्रम घेतले.