जालना प्रतिनिधी – भरधाव ट्रक चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने एका मजुरास उडवल्याची घटना शुक्रवारी (दि. 24) रात्रीच्या सुमारास एम आय डी सी भागात घडली आहे. अशोककुमार बृजबिहारी भगत (वय 25 वर्ष)असे या मयताचे नाव आहे.
दरम्यान, नागरिकांनी ट्रक चालकास पकडुन पोलिसांच्या केले स्वाधीन केले आहे. याबाबत मयताचा भाऊ राजुकुमार बृजबिहारी भगत याने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,
दि.24. रोजी रात्री 01.00 वा सुमारास माझा मयत भाउ अशोककुमार बृजबिहारी भगत रा. ग्राम बडहरा ता / थाना भोर जि.गोपालगंज राज्य- बिहार.ह.मू. सत्यमनगर चंदनझिरा जालना व त्याच्या सोबत असलेले 1) निजामोद्दीन ईसाकअन्सारी 2) रंजितकुमार रामचंद्रसिंग 3) विवेककूमार अनिल जाधव असे सर्व राजूरी स्टीलमधून कामावरून चंदनझिराकडे घरी येत होते. यावेळी जालनाकडून औरंगाबाद कडे जातांना सनराईज हॉटेल समोर चौकात ट्रक क्र. mh-17-c-6045 च्या चालकाने आपले वाहन भरधाव वेगात चालउन माझा भाउ नामे अशोककुमार बृजबिहारी भगत यास जोराची धडक दिली. यात त्याच्या डोक्यास मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यास दवाखाण्यात उपचारासाठी दाखल केले असता 02.00 वा मरण पावला आहे. सदर ट्रक चालक यास नागरिकांनी पकडले असून सदर ट्रक चालक याचे नाव एकनाथ अशोक जऱ्हाड वय 40 वर्ष रा. शिंगणापूर ता. कोपरगाव जि अहमदनगर आहे. असे म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.