जालना । नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे अंमलबजावणीसाठी प्रशिक्षीत शिक्षक ,उत्कृष्ट शैक्षणिक , व्यावसायिक प्रशिक्षण सुविधा आणि प्रगती बद्दल येथील जिंदल वर्ल्ड स्कूलला दोन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय शैक्षणिक फेडरेशनच्या ( आय. यु. ई. एफ.) वतीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अध्यापन करण्यासाठी, पायाभूत सुविधांची निर्मिती, शैक्षणिक,व्यावसायिक विकास, शिक्षकांचे प्रशिक्षण यात केलेली प्रगती लक्षात घेऊन गत शैक्षणिक वर्षातील मुल्यांकना आधारे ” शाळेस सतत व्यावसायिक विकास आणि प्रशिक्षणाची सर्वोकृष्ट शाळा” असे दोन पुरस्कार अयोध्या येथे झालेल्या राष्ट्रीय सोहळ्यात सी.बी.एस.ई .चे सचिव अनुराग ञिपाठी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. दरम्यान पी. सुरेश यांच्या प्रशिक्षणामुळे शाळेचा झालेला कायापालट याची दखल घेण्यात आली. पुरस्कार मिळाल्याबद्दल बनारसीदास जिंदल, जयभगवान जिंदल, गोपाल जिंदल यांच्या सह व्यवस्थापन समितीने, प्राचार्या,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंदांचे अभिनंदन केले आहे.