दहिफळ खंदारे शिवारातून पावणे पाच लाखाची गांजाची झाडे जप्त; मंठा पोलिसांची कारवाई

90

मंठा । मंठा तालुक्यातील दहिफळ खंदारे शिवारातील एका शेतातून उपविभागीय पोलीस अधिकारी परतुर व मंठा पोलिसांनी गुरुवारी (दि. 17) रोजी कारवाई करत पावणे पाच लाखाची गांजाची झाडे जप्त केली आहेत.

दहिफळ खंदारे शिवारात गांजाची झाडे लागवड केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी परतूर व पोलीस निरीक्षक मंठा व कर्मचाऱ्यांना मिळाली होती. यावेळी पोलिसांनी  प्रदीप थावरा राठोड यांच्या गट नंबर 367 मधील शेतात पाहणी केली असता लहान-मोठी 23 गांजाची झाडे साधारणतः पावणे पाच लाख रुपयाची झाडे जप्त करण्यात आली. ही गांजाची झाडे तुरीच्या उभ्या पिकात व कापसात लावलेली आढळून आली. या गांजाच्या झाडाचे वजन केले असता 31.160 किलोग्रॅम भरले. याप्रकरणी पंचा समक्ष पंचनामा करण्यात येऊन मंठा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 557/ 2022 कलम 20अ      एनडीपीसी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बलभीम राऊत हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी परतुर पोलीस निरीक्षक मंठा पोलीस हेडकॉन्स्टेबल अण्णासाहेब लोखंडे, ढवळे, राजाळे, मेखले, सुभाष राठोड, मुंडे, गायके, दीपक आडे व कर्मचाऱ्यांनी केली.