मुर्तीवेसच्या सुधारीत अहवालानुसार कार्यवाही करण्याचे वक्फ बोर्डाचे निर्देश

378

जालना । मुर्तीवेसच्या सुधारीत अहवालानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश आज वक्फ बोर्डाने पालिका प्रशासनास दिले आहेत.

याविषयी पालिकेस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दिनांक ०९/११/२०२२ च्या पत्रात, जालना येथील मुर्तीवेसचे पुर्नबांधकाम करणेबाबत या कार्यालयाच्या संदर्भाधिन दिनांक १३/१०/२०२२ च्या पत्रातील “अ) मुर्तीवेसचे जमिनीपासुन ४ फुट उंचीपर्यंतच्या मुळ बांधकामास हानी न पोहचविता उर्वरित धोकादायक भागाचे पुनर्बांधकाम करण्यास सहमती प्रदान करण्यात येत आहे. (पुर्नबांधकाम करतांना वास्तुची मुळ प्रतिमा जशीच्या तशी ठेवण्याची दक्षता घेण्यात यावी, यावरील खर्च नगरपालिका निधीतुन भागविण्यात यावा) असे दिले होते.

या ऐवजी आता सुधारीत संरचनात्मक लेखा परीक्षण अहवालामधील निष्कर्ष व शिफारशीनुसार मुर्तीवेसचे पुर्नबांधकाम करण्यास सहमती प्रदान करण्यात येत आहे. (पुर्नबांधकाम करतांना वास्तुची मुळ प्रतिमा जशीच्या तशी ठेवण्याची दक्षता घेण्यात यावी ) यावरील खर्च नगरपालिका निधीतुन भागविण्यात यावा.” असेही या पत्रकात म्हटले आहे.